Fincare Small Finance Bank: सर्वसामान्यपणे आघाडीच्या बँका अडीच ते साडेतीन टक्के व्याजदर बचत खात्यातील रकमेवर देतात. त्यापेक्षा जास्त व्याजदर पाहिजे असेल आणि जोखीमही घ्यायची नसेल तर ग्राहक मुदत ठेवींकडे वळतात. मात्र, आता आता बचत खात्यावरही 7.25% व्याजदर मिळू शकतो.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक 7.25% पर्यंत वार्षिक व्याजदर बचत खात्यातील रकमेवर देत आहे. नवे दर बँकेने 1 ऑगस्ट 2023 पासून लागू केले आहेत.
स्पर्धात्मक व्याजदराचा ग्राहकांना फायदा
"ग्राहकांचे आर्थिक ध्येय साध्य होण्यासाठी आम्ही त्यांना कायमच मदत करतो. आमच्या स्पर्धात्मक व्याजदरामुळे जास्तीत जास्त ग्राहक बचत खात्यात पैसे ठेवतील. ग्राहकांना चांगल्या दराचा लाभ घेता येईल, असे फिनकेअर बँकेचे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर आशिष मिश्रा यांनी म्हटले.
बचत खाते, चालू खाते, मुदत आणि आवर्ती ठेवीच्या सेवा बँकेकडून दिल्या जातात. (Saving Account best Interest rate bank) सोबतच सोने तारण कर्ज, मालमत्ता कर्ज, गृहकर्ज, ओव्हरड्राफ्ट सुविधा आणि अल्पकर्ज पुरवठा केला जातो.
19 राज्यात बँकेच्या शाखा
31 मार्च 2023 च्या आकडेवारीनुसार फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेच्या 1231 शाखा 19 राज्यामध्ये आहेत. 338 जिल्हे आणि 57,186 खेडेगावांमध्ये बँकेचे नेटवर्क पोहचले आहे. बँकेकडे 42 लाख ग्राहक असून एकूण कर्मचारी 14 हजारांपेक्षा जास्त आहेत.