Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Retirement Planning: निवृत्तीनंतर आर्थिक अडचणी टाळण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच

Retirement Planning

Image Source : https://www.freepik.com/

निवृत्तीनंतरचे आयुष्य आरामात घालविण्यासाठी आर्थिक तरतूद आधीपासूनच करणे गरजेचे आहे. त्यामुळे नोकरी करत असतानाच भविष्याचा विचार करून स्वतःची ‘बकेट लिस्ट’ तयार करणे आवश्यक आहे.

निवृत्तीनंतरचे आयुष्य आरामात घालविण्यासाठी आर्थिक तरतूद आधीपासूनच करणे गरजेचे आहे. निवृत्तीनंतर आयुष्यतला नवीन टप्पा सुरू होतो, उत्पन्न थांबलेले असते; अशावेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे नोकरी करत असतानाच भविष्याचा विचार करून स्वतःची ‘बकेट लिस्ट’ तयार करणे आवश्यक आहे.

निवृत्तीनंतरचे उर्वरित आयुष्य कसे घालवायचे? गुंतवणूक व उत्पन्नाचा मार्ग? छंद जोपासण्यासाठी काय करायला हवे? अशा विविध गोष्टींची बकेट लिस्ट तयार केल्यास याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. विशेष म्हणजे आर्थिक अडचणी टाळण्यास मदत होईल.

निवृत्तीसाठी तयार आहात का?

सर्वसाधारणपणे वयाची 60-65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर निवृत्ती घेतली जाते. मात्र, काहीजण वयाच्या 40-50व्या वर्षीही निवृत्ती स्विकारतात. परंतु, आयुष्यातील हा महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही निवृत्तीसाठी तयार आहात का? याचा विचार करायला हवा.

पेन्शन योजनांमध्ये गुंतवणूक केलेली असल्यास निवृत्तीनंतर फायदा मिळेल. मात्र, कोणतीही गुंतवणूक नसल्यास निवृत्तीनंतर आर्थिक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे उत्पन्नाचा विचार करूनच निवृत्ती स्विकारावी. तसेच, कर्ज, वैद्यकीय खर्च, कुटुंबाच्या गरजा इत्यादी गोष्टींचाही विचार करणे गरजेचे आहे.

स्वतःची बकेट लिस्ट तयार करा

सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदात घालविण्यासाठी नोकरी करत असतानाच बकेट लिस्ट तयार करायला हवी. या बकेट लिस्टमध्ये निवृत्तीनंतरचे आयुष्य कसे जगायला हवे, याऐवजी निवृत्तीनंतरच्या आयुष्यात आर्थिकदृष्ट्या कोणतीही समस्या येणार नाही, यासाठी काय करायला हवे याचा समावेश असावा. कर्ज, गुंतवणुकीपासून ते वैद्यकीय खर्चापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी विशेष फंडची तरतूद करायला हवी. दरमहिन्याला नियमित बचत कशी होईल, याचे नियोजन करणे गरजेचे आहे. 

तसेच, पेन्शन व्यतिरिक्त उत्पन्नाचा इतर मार्ग काय असेल, याचाही विचार करावा. आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यास निवृत्तीनंतरही प्रवासापासून ते छंद जोपासण्यापर्यंत, प्रत्येक गोष्ट सहज करणे शक्य होईल.

गुंतवणुकीला द्या प्राधान्य

सेवानिवृत्तीच्या बकेट लिस्टमध्ये गुंतवणुकीला सर्वाधिक प्राधान्य देणे गरजेचे आहे. निवृत्तीनंतर आरामात जगण्यासाठी किती गुंतवणूक पुरेसी आहे? असा प्रश्न तुम्हालाही कधीतरी पडला असेलच. मात्र, आकडेवारीमध्ये न अडकता शक्य तितकी जास्त बचत केल्यास फायदाच होईल. गुंतवणूक ही तुमचा खर्च, उत्पन्न व वय अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असते. त्यामुळे या सर्वांचा विचार करूनच गुंतवणूक करावी.