Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Film Budgets : चित्रपटांचे बजेट कसे बनते? कशावर जास्त खर्च होतो?

Film Budgets

आज आपण पाहतो की चित्रपटांवर निर्माते करोडो रुपये खर्च करतात. पण तुम्हाला माहिती आहे का? चित्रपटाचे बजेट कसे तयार केले जाते? (Film Budgets) चित्रपटासाठी येणाऱ्या खर्चाची विभागणी कशी केली जाते? ते आज आपण पाहूया.

कोणत्याही चित्रपटाच्या निर्मितीसाठी चित्रपटाचे बजेट किती आहे? (Film Budgets) हे आधी ठरवले जाते. सर्व प्रथम बजेट ठरवले जाते. यानंतर चित्रपटाचे बजेट चार भागात विभागण्यात येते. चित्रपट निर्मिती क्षेत्रात (Film Industry) यासाठी वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. बजेटला अबोव्ह द लाईन, बिलो द लाईन, पोस्ट प्रोडक्शन आणि चित्रपटाशी निगडीत गोष्टींचा विमा असे हे चार हिश्शे असतात. चित्रपटांचा बजेट कसा ठरवतात? हे सविस्तरपणे पाहूया.

अबोव्ह द लाइन

अबोव्ह द लाइन म्हणजे मोठ्या गोष्टी किंवा आपण याला चित्रपटाचा मोठा खर्च म्हणूनही पाहू शकतो. यात स्क्रिप्ट, निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते-अभिनेत्री यांच्यावर खर्च झालेला पैसा जोडला जातो. सर्व प्रथम, कोणत्याही चित्रपटाच्या स्क्रिप्टवर चर्चा होते. पटकथा लेखकाने पटकथा लिहून दिली असेल, तर त्या बदल्यात त्याला मिळणारे मानधन चित्रपटाच्या बजेटमध्ये नमूद केले जाते. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या जीवनावर चित्रपट बनत असेल तर त्याचे हक्क त्याच्या कुटुंबीयांकडून घ्यावे लागतात. त्यासाठी बजेटमध्ये पैसेही निश्चित केले जातात. अबोव्ह द लाईनमध्ये निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांचे मानधन देखील समाविष्ट असते. हे वेतन चित्रपटाचे बजेट ठरवतात. मोठे दिग्दर्शक आणि अभिनेते भरमसाठ फी घेतात. सलमान खान, शाहरुख खान, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण यांसारख्या कलाकारांना चित्रपटाच्या उर्वरित बजेटपेक्षा जास्त मानधन मिळते. सलमान आणि शाहरुखसारखे स्टार्स एका चित्रपटासाठी 30 ते 40 कोटी रुपये घेतात. हॉलिवूडमध्येही पगार जास्त आहे.

बिलो द लाईन

बिलो द लाईनमध्ये असे खर्च समाविष्ट असतात जे फार मोठे नसतात किंवा ज्यांची चर्चा कमी असते. जसे की, चित्रपटाच्या नायकाकडून आकारण्यात येणाऱ्या फीच्या अनेक बातम्या ऐकायला मिळतात, पण हेअर स्टायलिस्ट आणि कॅमेरा ऑपरेटर यांच्यावरील खर्चाच्या बातम्या ऐकायला मिळत नाहीत. चित्रपटात नायक, नायिका, दिग्दर्शक आणि निर्मात्याशिवाय एक मोठी टीमही हवी असते. या मोठ्या टीमचे बजेट बिलो द लाईनमध्ये येते. असिस्टंट डायरेक्टर, आर्ट डायरेक्टर, कॅमेरा ऑपरेटर, ग्राफिक आर्टिस्ट, साउंड इंजिनीअर, टेक्निकल डायरेक्टर असे बरेच लोक बिलो द बजेट मध्ये येतात. हे सर्व चित्रपटाचा महत्त्वाचा भाग असतात. या सर्वांसाठीसुद्धा खूप खर्च करण्यात येतो. सुप्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट दिवसाला लाखो रुपये घेतात. फिल्म एडिटरसुद्धा भरमसाठ फी घेतात.

विम्यासारखे इतर अनेक खर्च

आजकाल, आणखी एक मोठा खर्च जो बजेटचा एक मोठा भाग असतो तो म्हणजे विमा. देश-विदेशात शूटिंगदरम्यान कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ शकतो, त्यामुळे चित्रपटातील सदस्य आणि कॅमेरा आणि सर्व महागड्या वस्तूंचा विमा उतरवण्यात येतो. यामध्ये चित्रपटाच्या जाहिरातीवरील खर्चाचीही भर पडते. गेल्या काही वर्षांपासून बजेटचा मोठा भाग चित्रपटाच्या प्रमोशनवर खर्च होतो. याशिवाय चित्रपटासाठी स्टुडिओ भाड्याने घेतल्यास त्याचा खर्चही या बजेटमध्ये जोडला जातो.