गेल्या काही महिन्यांपासून देशातील महागाई नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. देशातील किरकोळ आणि घाऊक वस्तूंच्या किमती देखील कमी झाल्या असल्याने, देशातील महागाई कमी होत असल्याचे अर्थतज्ञांचे मत आहे. याचाच परिणाम म्हणून गेल्या सलग 2 पतधोरण बैठकांमध्ये आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केलेली नाहीये. सामान्य नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, महागाई निर्धारित मर्यादेत आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, आणि हे काम अजून पूर्ण झालेले नाहीये. गव्हर्नर शक्तिकांस दास यांनी पतधोरण समितीच्या (MPC) बैठकीत झालेल्या चर्चेविषयी विस्तृत माहिती जाहीर केली आहे.
गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, भारताची सूक्ष्म अर्थव्यवस्था सध्या उत्तम कामगिरी करत असल्याचे म्हटले आहे. देशातील लघु उद्योग समाधानकारक काम करत असून त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील सकारात्मक परिणाम पाहायला मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 6 ते 8 जून दरम्यान मुंबईत आरबीआयची पतधोरण बैठक पार पडली होती.
Fight against inflation not over, job only half done: RBI Governor
— ANI Digital (@ani_digital) June 22, 2023
Read @ANI Story | https://t.co/TPUTMVDtlz#RBI #ShaktikantaDas #Inflation #MPC #MonetaryPolicy pic.twitter.com/KIQb9dRxtM
या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सलग दुसऱ्यांदा 6.50% रेपो दर कायम ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. यामुळे देशातील महागाई कमी होत असल्याचे अनेकांनी म्हटले होते. मात्र यावर बोलताना गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले आहे की, महागाई नियंत्रणात आली असली तरी महागाईविरोधात आपल्याला आणखी भरपूर योजना करायच्या आहेत. महागाई विरोधात भारताची ही अर्धी लढाई आहे, असे ते म्हणाले आहेत.
महागाई नियंत्रणात
किरकोळ महागाई 2 ते 4 टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्यासाठी आरबीआय प्रयत्नशील असते. सामान्य नागरिकांवर या मर्यादेतील महागाईचा परिणाम जाणवत नाही. त्यामुळे महगाईचा दर 2 ते 4 टक्क्यांच्या मर्यादेत असल्यास अर्थव्यवस्थेसाठी ते अनुकूल असल्याचे मानले जाते. मे महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई 4.25 टक्क्यांवर घसरला होता तर घाऊक महागाईचा दर एप्रिलमध्ये 3.48 टक्के होता तर मे महिन्यात तो -0.92 टक्क्यांवर पोहोचला हे विशेष.
महागाईविरुद्धचा लढा संपलेला नाही
येत्या काळात रेपो रेट वाढतील की कमी होतील हे आम्ही सांगू शकत नाही असे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले आहे. चलनवाढीचा धोका अजूनही कायम आहे, त्याविरोधात आरबीआयला उपायोजना करायच्या आहेत. त्यामुळे भविष्यात रेपो रेट कमी होतील किंवा वाढतील याचे स्पष्ट उत्तर देणे कठीण आहे असे ते म्हणाले आहेत.