Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MTDC Fellowship: पर्यटन क्षेत्रात तरुणांना फेलोशिपची संधी! दरमहा मिळणार 40 हजारांपर्यंत मानधन

MTDC Fellowship

MTDC Fellowship: महाराष्ट्राला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. ती राज्याची सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होत आहे. त्यापैकी एक म्हणजे, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली फेलोशिप उपक्रमाची आखणी केली आहे.

MTDC Fellowship: महाराष्ट्राला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. ती राज्याची सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होत आहे. त्यापैकी एक म्हणजे, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली फेलोशिप उपक्रमाची आखणी केली आहे. पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

MTDC च्या फेलोशिप उपक्रमातंर्गत 2023 मध्ये पर्यटन क्षेत्रातील स्टडी, रिसर्च , पर्यटन आधारित संस्था आणि पुढाकार विकसित करणे, प्रशिक्षण आणि फेलोची वाढ करणे, या गोष्टी साध्य करण्यात येणार आहे. 

या उपक्रमाच्या माध्यमातून व्यवसाय विकास, विपणन, रेस्टॉरंट ऑपरेशन्स, जलपर्यटन, विधी, विशिष्ट आणि अनुभवात्मक पर्यटन, टूर पॅकेजेस, प्रशिक्षण, पर्यटन पायाभूत सुविधा, कॉर्पोरेट अकाउंटिंग, पर्यटन नावीन्यपूर्ण प्रकल्प, बैठका, परिषद, प्रोत्साहन आणि प्रदर्शन यासारख्या एमटीडीसीच्या विविध विभागांमधील तज्ज्ञांच्या आवश्यकतेतील अंतर कमी करण्यास मदत होणार आहे.

समाजमाध्यम, निर्मिती, ब्रॅंडींग, डिझाइन, डिजिटल मार्केटिंग, प्रसिद्धी, आंतरराष्ट्रीय संबंध, सामान्य व्यवस्थापन, जबाबदार पर्यटन, महसुली यंत्रणेत सुधारणा आणि उत्पन्न व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील तरुणांकडून, त्यांची तंत्रज्ञानाची आवड आणि नवीन दृष्टिकोन मिळवणे आदी बाबी या उपक्रमात समाविष्ट केलेल्या आहेत.

MTDC फेलोशिपसाठी पात्रता 

  • या फेलोशिप उपक्रमासाठी उमेदवाराचे वय 21 ते 26 वर्ष असणे आवश्यक आहे. 
  • कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणी प्राप्त पदवीधारक तरुणांना फेलोशिपसाठी अर्ज करता येणार आहे.
  • फेलोशिप उपक्रमातील विषयात पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
  • फेलोशिपसाठी उमेदवारांना किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. 
  • निवड झालेल्या फेलो उमेदवारांना दरमहा 40 हजार रुपये छात्रवृत्ती आणि 5 हजार रुपये,
  • प्रवास भत्ता व इतर खर्च असे 40 हजार रुपये दरमहा देण्यात येणार आहेत.

अर्ज कुठे करावा? 

फेलोशिपसाठी इच्छुक तरुणांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महाव्यवस्थापक यांच्या आणि महाराष्ट्र टुरिझमच्या अधिकृत वेबसाइटवर आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन पद्धतीने 15 मे पर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन पर्यटन विकास महामंडळाद्वारे करण्यात आले आहे.

(News Source: https://obcadhikarikarmacharisangh.com)