PM Kisan Aadhaar Link Bank Account Balance: ज्या शेतकऱ्यांना पीएम योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे आधार कार्ड बॅंक खात्याशी जोडणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बॅंक खात्याशी जोडले गेले नाहीत, त्यांनी राज्यात आयपीपीबी (इंडिया पोस्ट पेमेंट बँक) च्या माध्यमातून आयोजित केलेल्या मोहिमेमध्ये सहभागी होऊन आपले बॅंक खाते उघडण्याचे आवाहन कृषी आयुक्तालयाचे कृषी संचालक विकास पाटील यांनी केले आहे.
आधार कार्ड अनिवार्य (Aadhaar Card Mandatory)
पीएम किसान सन्मान योजनेच्या 13 व्या हप्त्यासाठी आधार कार्ड बॅंक खात्याशी जोडणे अनिवार्य केले आहे. म्हणजेच जर एखादया शेतकऱ्याचे आधार कार्ड बॅंक खात्याशी जोडले गेले नसेल, तर त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 13 वा हप्ता जमा होणार नाही. यासंदर्भात राज्यात इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेत 1 ते 12 फेब्रुवारी 2013 या दरम्यान मोहीम राबविण्यात आली आहे. याबाबत शेतकऱ्यांना काहीही समस्या असल्यास या ठिकाणी त्याचे समाधान दिले जाईल.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकशी साधा संपर्क (Easy contact with India Post Payment Bank)
महाराष्ट्रात सध्या पीएम किसान योजनेचा लाभ कित्येक शेतकरी घेत आहेत. पण त्यातील 14.32 लाख लाभार्थ्यींची बॅंक खाती ही आधार कार्डशी जोडली गेली नाहीत. जर तुम्हाला आपले आधार कार्ड बॅंक खात्याशी जोडायचे आहे, तर तुम्ही गावातील पोस्ट कर्मचाऱ्यांशी संवाद साधा. त्यांच्याव्दारे या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. जर तुमचे आधार कार्ड बॅंक खातेशी जोडले गेले नसेल, तर तुमच्या खात्यात 13 वा हप्ता जमा होणार नाही. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) या यादया उपलब्ध करून दिल्या आहेत. या बॅंकेला भेट द्या व आपला आधाक क्रमांक बॅंक खात्याशी जोडा.