Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

या शेअर्समध्ये घसरण; तज्ज्ञांचा इशारा ग्लॅमरस IPO पासून दूर राहा

या शेअर्समध्ये घसरण; तज्ज्ञांचा इशारा ग्लॅमरस IPO पासून दूर राहा

पेटीएमच्या शेअर्समध्ये येत्या काही दिवसात आणखी घसरण होऊ शकते. Jama Wealth चे सीईओ राम कल्याण मेदुरी यांच्या मते पेटीएमचा शेअर 450 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो.

पेटीएमची (Paytm) मूळ कंपनी असलेल्या One 97 Communications च्या शेअर्सची घसरण अजून सुरूच आहे. सोमवारी पेटीएमच्या शेअर्समध्ये 5.25 टक्क्यांनी घसरून झाली असून तो दिवसअखेर 565.70 वर स्थिरावला. येत्या काही दिवसांत पेटीएमच्या शेअर्समध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जामा वेल्थ (Jama Wealth)चे सीईओ राम कल्याण मेदुरी यांच्या मते पेटीएमचा शेअर 450 रुपयांच्या खाली येण्याची शक्यता आहे.

ग्लॅमरस आयपीओंपासून दूर राहा
One 97 Communications कंपनीला अजूनही भविष्यातील व्यावसायिक मॉडेलची स्पष्टता देता आलेली नाही. पेटीएमचे शेअर्स विक्रीला खुले झाल्यापासून आतापर्यंत सुमारे 70 टक्क्यांनी घसरले आहेत आणि ते आणखी खाली म्हणजे 450 रूपयांपर्यंत येऊ शकतात, असा अंदाज मेदुरी यांनी व्यक्त केला असून त्यांनी गुंतवणूकदारांना पेटीएमसारख्या इतर ग्लॅमरस आयपीओपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. मेदुरींच्या मते, जगभरातील बॅंका महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी व्याजदर वाढवत आहेत. अशा परिस्थितीत कंपन्यांना निधी उभारणे अवघड होणार असून त्यांना त्यांची गुंतवणूक विकणे भाग पडेल. 

मेदुरी म्हणाले की, जगभरातील मध्यवर्ती बँका आता महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्याजदर वाढवत आहेत. अशा स्थितीत इक्विटी कंपन्यांना नव्याने निधी उभारणे कठीण होऊ शकते. त्यामुळे त्यांना यातून एक्झिट करणे भाग पडू शकते. जगात युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यामुळे शेअर मार्केटमध्ये अस्थिरता आहे.