Abdul Kamal Scholarship: नुकतेच दहावी आणि बारावीचे निकाल लागले आहेत. त्यामुळे बरेच विद्यार्थ्या नवीन अभ्यासक्रमासाठी अॅडमिशन घेण्यासाठी आणि स्कॉलरशिप (Scholarship) मिळवण्यात व्यस्त आहेत. पण अशा विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप मिळवताना आपली फसवणूक होणार नाही याची विशेष काळजी घेतली पाहिजे.
सध्या गुगल आणि इंटरनेटवर स्कॉलरशिपबद्दल अनेक जणांकडून विचारपूस होत आहे. ज्यांना स्पेसिफिक स्कॉलरशिपबद्दल माहिती हवी आहे. ते त्या स्कॉलरशिपच्या नावावरून अधिक माहिती शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ज्यांना स्कॉलरशिपबद्दल विशेष माहिती नाही. ते सरसकट सर्व स्कॉलरशिपबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
माजी पंतप्रधानांच्या नावाने फसव्या स्कॉलरशिप
सध्या इंटरनेटवर माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम स्कॉलरशिप (Dr APJ Abdul Kalam Scholarship 2023) आणि डॉ. मनमोहन सिंग स्कॉलरशिप (Dr. Manmohan Singh Scholarship 2023) या नावाने विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल केली जात असल्याचे दिसून येते. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिली जात असल्याचे काही वेबसाईट्सवरून सांगितले जात आहे. यामध्ये काही वेळेस पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी स्कॉलरशिप (PM Atal Bihari Vajpatee Scholarship) यांच्या नावानेही स्कॉलरशिप दिली जात असल्याचे सांगितले जात आहे.
सरकारकडून वेळोवेळी जनजागृती
पण अशी कोणतीही स्कॉलरशिप केंद्र सरकारकडून दिली जात नाही. याबाबत सरकारने वेळोवेळी अशा माहितीचे खंडन केले आहे. पण काही चुकीच्या व्यक्तींकडून अशा फसव्या स्कॉलरशिपबद्दल खोटी माहिती प्रसारित केली जात आहे. याबाबत विद्यार्थी आणि पालकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. कारण या माध्यमातून तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते किंवा तुमची वैयक्तिक माहिती मिळवली जाऊ शकते. त्यामुळे अशा जाहिरातींमधून दिलेल्या लिंकवर क्लिक करू नका. सरकारकडून अशा खोट्या आणि फसव्या माहितीबद्दल वेळोवेळी सूचना प्रसिद्ध केली जाते.