कतारमध्ये फिफा फुटबॉल फिव्हर सुरू झाला आहे. फुटबॉल हा जगातील सर्वांत पॉप्युलर आणि सर्वाधिक पाहिला जाणारा खेळ आहे. त्यात फुटबॉलचा वर्ल्ड कप ही चाहत्यांसाठी पर्वणीच असते. जवळजवळ 5 बिलिअन फुलबॉलप्रेमी कतारमध्ये FIFA World Cup 2022 चा आनंद घेत आहेत. 5 बिलिअन ही संख्या जगातील एकूण लोकसंख्येच्या निम्मी आहे. फुटबॉल हा फक्त आता खेळ राहिला नसून तो एक बिझनेस आयकॉन ठरू लागला आहे. कारण या खेळात सहभागी होणाऱ्या खेळाडुंची लाईफस्टाईल, त्यांचे डिझायनर कपडे, महागड्या आणि लक्झरी कार्स हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. याचबरोबर या खेळाडुंचे आरोग्य आणि त्यांचे महागडे बॉडी पार्ट इन्शुरन्स (Expensive Body Part Insurance) तितकाच महत्त्वाचा विषय आहे.
एखाद्या सेलिब्रेटीने आपल्या शरीरातील एखाद्या अवयवाचा इन्शुरन्स काढणे, ही तशी नवीन गोष्ट नाही; पण इन्शुरन्स प्रकारामधील हा युनिक प्रकार मानला जातो. कारण अर्थातच त्या व्यक्तीच्या त्या अवयवाचे महत्त्व अलौकिक आहे. तो अवयव त्या व्यक्तीसाठी त्याचे अॅसेट असेल तर त्या अवयवाची नुकसान भरपाई म्हणून अशा सेलिब्रेटींकडून बॉडी पार्ट इन्शुरन्स (Body Part Insurance) काढला जातो. आज आपण अशाच फुटबॉल खेळांडुंबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी त्यांचे महत्त्वाचे अवयव बॉडी पार्ट इन्शुरन्सने आर्थिकदृष्ट्या सुरक्षित केले आहेत.
Table of contents [Show]
बॉडी पार्ट इन्शुरन्स म्हणजे काय? What is Body Part Insurance?
इन्शुरन्स (Insurance) म्हटले की, यामध्ये कोणत्या गोष्टी लागू होतात. त्याचा फायदा काय? हे आपल्या सर्वांना माहित आहे. त्याप्रमाणेच बॉडी पार्ट इन्शुरन्स पॉलिसी सर्वसाधारण इन्शुरन्स पॉलिसीसारखीच आहे; फक्ता की शरीराच्या विशेष अवयवाशी संबंधित असते. त्या अवयवाला इजा झाल्यास किंवा गंभीर दुखापत झाल्यास त्या अवयवाची आर्थिक नुकसान भरपाई उपलब्ध करून देण्याची सुविधा या इन्शुरन्समध्ये असते. जर इन्शुरन्स काढलेला अवयव खराब झाल्यामुळे संबंधित व्यक्तीचे आर्थिक नुकसान होत असेल तर इन्शुरन्स काढलेल्या व्यक्तीला इन्शुरन्स कंपनीकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळते.
बॉडी पार्ट इन्शुरन्स काढलेले फुटबॉल खेळाडु | Footballer with Insured Body Parts
लिओनिल मेस्सी (Lionel Messi)

आर्जेटिना देशाकडून खेळणारा लिओनिल मेस्सी फुटबॉलच्या इतिहासातील ग्रेटेस्ट फुटबॉल प्लेअर म्हणून याची नोंद आहे. मेस्सीने त्याचा उजव्या पायाचा इन्शुरन्स काढला आहे. या इन्शुरन्सची किंमत 750 मिलिअन युरो (6,327 कोटी रुपये) आहे. फुटबॉल खेळाडुंमधील हा सर्वांत महागडा इन्शुरन्स असल्याचे सांगितले जाते.
डेव्हिड बेकहॅम (David Beckham)

डेव्हिड बेकहॅम याने त्याच्या दोन्ही पायांचा इन्शुरन्स काढला होता. त्याची साधारण किंमत 40 मिलिअन युरो (337 कोटी रुपये) होती. त्याची आताची किंमत ही सुमारे 675 कोटी रुपये इतकी आहे. डेव्हिड नंतर संपूर्ण शरीराचा इन्शुरन्स काढला त्याची किंमत 190 मिलिअन युरो म्हणजे 1,603 कोटी रुपये आहे. डेव्हिड बेकहॅम हा जगातील सर्वांत श्रीमंत खेळाडू म्हणून ओळखला जातो.
क्रिस्तीआनो रोनाल्डो (Cristiano Ronaldo)

2009 मध्ये रिअल माद्रिद क्लबने त्यांचा स्टार फुटबॉल खेळाडू क्रिस्तीआनो रोनाल्डो याच्या पायांचा सुमारे 130 मिलिअन युरोचा (1097 कोटी रुपये) इन्शुरन्स काढला होता. रिअल माद्रिदबरोबरच संपूर्ण जगाला माहित आहे की, रोनाल्डोच्या पायाजवळ फुटबॉल आला की, काय जादू होते. म्हणून क्लबने त्याच्यासाठी एवढा पैसा खर्च केला आहे.
गॅरेथ बॅले (Gareth Bale)

गॅरेथ बॅले याने त्याचे फुटबॉलमधील करिअस संपल्यानंतर येणाऱ्या दुखापतींपासून आर्थिक संरक्षण मिळवण्यासाठी स्वत:च्या पायाचा सुमारे 100 मिलिअन युरोचा (844 कोटी रुपये) इन्शुरन्स काढला आहे.
इकेर कॅसिलास (Iker Casillas)

इकेर हा फुटबॉल हिस्ट्रीमधील एक ग्रेटेस्ट गोलकीपर (Greatest Goalkeeper in Football History) म्हणून ओळखला जातो. त्याने त्याच्या हातांचा अंदाजे 15 मिलिअन युरोचा (126 कोटी रुपये) इन्शुरन्स काढला आहे. इकेरमुळे स्पेनने 2010चा वर्ल्ड कप आणि 2012 चा युरो कप जिंकला होता.
मॅन्युएल नेऊर (Manuel Neuer)

जर्मनीचा मॅन्युएल नेऊर हा सध्याचा जगातला बेस्ट गोलकीपर मानला जातो. त्याने त्याच्या हातांचा इन्शुरन्स काढला आहे. त्याची किंमत 4 मिलिअन डॉलर (33 कोटी रुपये) इतकी आहे. हा जगातील सर्वांत महागडा गोलकीपर (Highest Paid Goalkeeper) म्हणूनही ओळखला जातो.