Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Body Part Insurance : बॉडी पार्ट इन्शुरन्स म्हणजे काय?

Body Part Insurance

Body Part Insurance : संपूर्ण शरीराचा किंवा व्यक्तीचा इन्शुरन्स काढणे किंवा असणे हे नॉर्मल आहे. पण एखाद्या मोठ्या व्यक्तीने त्याच्या शरीरातील एखाद्या अवयवाचा इन्सुरन्स काढणे हे नक्कीच काहीतरी वेगळे आहे. भारतात सेलिब्रेटी आणि खेळाडुंकडून बॉडी पार्ट इन्शुरन्स काढला जातो.

तुम्ही बातम्यामधून कधीतरी ऐकले असेल की, पाकिस्तानी गायक अदनान सामी (Pakistani Singer Adnan Sami) याने त्याच्या बोटांचा इन्शुरन्स काढला किंवा भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Bharat Ratna Lata Mangeshkar) यांनी त्यांच्या गळ्याचा म्हणजे गळ्यातील स्वरयंत्राचा इश्युरन्स काढला होता तर प्रियांका चोप्राने तिच्या पाऊटचा इन्शुरन्स (Priyanka Chopra Pout Insurance) काढला. यावरून सर्वसामान्यांना प्रश्न पडला असेल की, अशा गोष्टींचासुद्धा इन्शुरन्स काढला जातो का? कारण सर्वसामान्यांना परिचित असलेला आणि माणसाशी संबंधित विमा म्हणजेच इन्शुरन्स हा लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स इथपर्यंतच मर्यादित होता. पण आता हा इन्शुरन्स एवढ्यावरच थांबलेला नाही. शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांचादेखील इन्शुरन्स काढता येतो. पण असा इन्शुरन्स तुम्हाला तुमच्या नेहमीच्या इन्शुरन्स कंपनीदवारे नाही काढता येत किंवा याची स्टॅण्डर्ड पॉलिसीसुद्धा नाही. यासाठी स्पेशल इन्शुरन्स कंपन्या आहेत. त्याच अशा खास अवयवांचा किंवा बॉडी पार्टचा इन्शुरन्स  (Body Part Insurance) काढून देतात. चला तर बॉडी पार्ट इन्शुरन्स म्हणजे काय? तो कसा आणि कोणाकडून काढता येतो? याविषयी सविस्तर माहिती घेवू.

शरीराच्या एखाद्या अवयवाचा किंवा भागाचा इन्शुरन्स (Insurance) काढणे ही संकल्पना तशी आता नवीन राहिली नाही. पण अशाप्रकारचा इन्शुरन्स काढणाऱ्या व्यक्ती मात्र नक्कीच मोजक्या आहेत आणि त्या एकतर श्रीमंत आहेत; किंवा त्या मोठ्या सेलिब्रेटी आहेत.

संपूर्ण शरीराचा किंवा व्यक्तीचा इन्शुरन्स काढणे किंवा असणे हे नॉर्मल आहे. पण एखाद्या मोठ्या व्यक्तीने त्याच्या शरीरातील एखाद्या अवयवाचा इन्सुरन्स काढणे हे नक्कीच काहीतरी वेगळे आहे. कारण अर्थातच त्या व्यक्तीच्या त्या अवयवाचे महत्त्व अलौकिक आहे. तो अवयव त्या व्यक्तीसाठी त्याचे अॅसेट असेल तर त्या अवयवाची नुकसान भरपाई म्हणून अशा सेलिब्रेटींकडून बॉडी पार्टचा इन्शुरन्स काढला जातो.

बॉडी पार्ट इन्शुरन्स पॉलिसी काय आहे? What is Body Part Insurance Policy?

बॉडी पार्ट इन्शुरन्स पॉलिसी ही संबंधित अवयवाला इजा झाल्यास किंवा गंभीर दुखापत झाल्यास त्या अवयवाची आर्थिक नुकसान भरपाई उपलब्ध करून देण्याची सुविधा असते. जर इन्शुरन्स काढलेला अवयव खराब झाल्यामुळे संबंधित व्यक्तीचे आर्थिक नुकसान होत असेल तर ती व्यक्ती तो अवयव इन्शुरन्स पॉलिसीद्वारे तो अवयव आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू शकते.

बॉडी पार्ट इन्शुरन्स पॉलिसीतील महत्त्वाची वैशिष्ट्ये! Features of Body Part Insurance Policy!

बॉडी पार्ट इन्शुरन्स पॉलिसी ही पूर्णत: कस्टमाईज पॉलिसी आहे; म्हणजे प्रत्येक व्यक्ती त्याच्या गरजेनुसार ती विकत घेऊ शकतो. तसेच यामध्ये शरीराचा प्रत्येक भाग कव्हर होतो. जसे की, तुमच्या हाता-पायाच्या नखांपासून डोक्यावरील केसांपर्यंत, यामध्ये मिशीचासुद्धा इन्शुरन्स काढण्याची सुविधा आहे.

  • अशाप्रकारच्या इन्शुरन्ससाठी कोणतेही आर्थिक बंधन नाही. कितीही मूल्याचा आणि किमतीचा इन्शुरन्स काढता येतो. बहुतांश सेलेब्रिटी त्यांच्या अवयवांसाठी खूपच मोठ्या रकमेचा इन्शुरन्स काढतात.
  • ही पॉलिसी वर्षभरासाठी असते; आणि तिचे नुतनीकरण करता येते.
  • या पॉलिसीच्या प्रीमिअमची रक्कम खूपच जास्त असते.
  • या पॉलिसीमध्ये संबंधित अवयवाचा तात्पुरता आणि कायमचे अंपगत्व असे दोन्ही कव्हर असतात.
  • रेग्युलर पॉलिसीच्या तुलनेत बॉडी पार्ट पॉलिसीचे नियम थोडे कठोर आहेत.


बॅंक आणि इन्शुरन्स कंपन्यांचे नियम! Bank & Insurance Company’s Rules

बॅंक किंवा इन्शुरन्स कंपन्या बॉडी पार्ट इन्शुरन्सची सेवा देताना अनेक गोष्टी पडताळून घेते. त्यातील महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊ.

  • इन्शुरन्स काढणाऱ्या व्यक्तीचे आरोग्य, लाईफस्टाईल त्याची समाजातील प्रसिद्धी.
  • ज्या अवयवाचा इन्शुरन्स काढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामध्ये उद्भवणारे धोके तपासले जातात.
  • या पॉलिसीसाठी खूपच महागडा असा प्रीमिअम चार्ज केला जातो. अर्थात हा चार्ज सर्वांसाठी समान नसतो. इन्शुरन्स काढणाच्या व्यक्तीचे उत्पन्न हे बॅंका आणि इन्शुरन्स कंपन्यांकडून प्रामुख्याने पाहिले जाते.
  • इन्शुरन्सचा प्रीमिअम आणि नुतनीकरणाची रक्कम ही प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी असू शकते. तसेच प्रत्येक अवयवासाठीसुद्धा इन्शुरन्स कंपन्या वेगवेगळा चार्ज स्वीकारतात.


असा इन्शुरन्स कोणत्या कंपन्या विकतात? Who Offers this Insurance?

अशाप्रकारचा बॉडी पार्ट इन्शुरन्स प्रीमिअम इन्शुरन्स कंपन्या पुरवतात. जसे की, आयसीआयसीआय लोम्बार्ड (ICICI Lombard), युनायटेड इंडिया इन्शुरन्स (United India Insurance), बजाज अलायेंझ (Bajaj Allianz) आणि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी (New India Insurance Company) या मार्केटमधील प्रसिद्ध कंपन्या अशाप्रकारची इन्शुरन्स सेवा देतात.

बॉडी पार्ट इन्शुरन्स पॉप्युलॅरीटी! Popularity of Body Part Insurance!

बॉडी पार्ट इन्शुरन्स हा भारतात विशेषकरून फेमस सेलिब्रेटी आणि खेळाडुंमध्ये प्रसिद्ध आहे. सर्वसामान्य किंवा मिडलक्लास लोकांना याबाबत अधिक माहितीसुद्धा नाही आणि असा एखाद्या अवयवाचा इन्शुरन्स काढणे हे स्वस्तात होणारे काम नाही. यासाठी भरमसाठ पैसे खर्च करावे लागतात.