Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

OnePlus 10T 5G वर 13,300 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर, जाणून घ्या डिटेल्स

OnePlus 10T 5G

Image Source : http://www.oneplus.in/

OnePlus 10T 5G अतिशय कमी किमतीत खरेदी करता येईल. 13,300 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे, जाणून घेऊया ऑफर्स डिटेल्स.

OnePlus 10T 5G: सद्यस्थितीमध्ये  OnePlus हे मॉडेल अतिशय लोकप्रिय झालेले आहेत. अशातच OnePlus 10T हा मोबाइल तुम्ही Amazon वरून अगदी कमी किमतीत खरेदी करता येईल. तुम्हाला जर  हा मोबाइल खरेदी करायचा असेल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. हा मोबाइल तुम्ही एक्सचेंज ऑफरसह नाही तर EMI अंतर्गत देखील खरेदी करू शकता. हा मोबाइल  49,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह लॉन्च करण्यात आला होता. जाणून घ्या आताची किंमत आणि ऑफर्स डिटेल्स. 

OnePlus 10T 5G डिस्काउंट (OnePlus 10T 5G Discount)

या फोनचे 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 49,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकतात. यासोबत 13,300 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यावर तुम्हाला हा फोन 36,699 रुपयांना मिळेल. त्याच वेळी, EMI अंतर्गत फोन खरेदी करण्यासाठी दरमहा किमान 2,389 रुपये भरावे लागतील.

OnePlus 10T 5G चे फीचर्स (Features of OnePlus 10T 5G)

OnePlus 10T मध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट देण्यात आला आहे. यात 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश दर 120 Hz आहे. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. त्याचा पहिला सेन्सर 50 मेगापिक्सेलचा आहे. दुसरी 8-मेगापिक्सलची अल्ट्रावाइड लेन्स आहे आणि तिसरी 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आहे. फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. यासोबतच 4800mAh बॅटरी देण्यात आली आहे ज्यात 150W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन OxygenOS वर आधारित Android 12 वर काम करतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

OnePlus चे काही मॉडेल आणि किमती (Some OnePlus models and prices)

  • OnePlus Nord CE 2 Lite 5G  - 18999
  • Oneplus 10 Pro 5G (256GB ROM, 12GB RAM,Volcanic Black) - 66999 
  • OnePlus 10R 5G - 34999 
  • OnePlus Nord 2 5G 31799