• 28 Nov, 2022 17:00

ETF Vs Mutual Funds : यापैकी काय निवडावे?

ETF Vs Mutual Fund

ETF Vs Mutual Funds : भारतातील उपलब्ध असलेल्या अनेक गुंतवणूक पर्यायांपैकी म्युच्युअल फंड आणि ईटीएफ हे सर्वात लोकप्रिय पर्याय आहेत. या गुंतवणुकीच्या दोन पर्यायांमधील फरक जाणून घेऊ आणि यापैकी कोणता पर्याय कसा निवडावा? याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ.

स्वत:चे आर्थिक भविष्य सुरक्षित करणं, हे आयुष्यातील इतर अनेक कामांपैकी सर्वांत महत्त्वाचे आणि आवश्यक असलेले काम आहे. कारण गुंतवणूक करणं हे पैसे कमावण्या एवढंच महत्त्वाचं आहे. जेव्हा तुमच्याकडे नियमित उत्पन्नाचे साधन नसते; तेव्हा स्वत:चे भविष्य सुरक्षित करण्याचा हा एकमेव सुरक्षित मार्ग आहे. सध्या मार्केटमध्ये एलआयसी, पीपीएफ, फिक्सड् डिपॉझिटसारख्या पारंपरिक पर्यायांसोबत अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. सध्याची तरूण पिढी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सर्वाधिक पसंती देत आहेत. कारण यातून सर्वाधिक रिटर्न्स मिळण्याची शक्यता असते. पण त्याचबरोबर तेवढीच जोखीमही असते.  

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे बरेच सुरक्षित पर्यात आहेत; जसे की, म्युच्युअल फंड, इंडेक्स फंड, ईटीएफ इत्यादी. ईटीएफ आणि म्युच्युअल फंडमध्ये बऱ्यापैकी साम्य आहे. पण हे गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय आहेत. भारतातील उपलब्ध असलेल्या अनेक गुंतवणूक पर्यायांपैकी म्युच्युअल फंड आणि ईटीएफ हे सर्वात लोकप्रिय पर्याय आहेत. या गुंतवणुकीच्या दोन पर्यायांमधील फरक जाणून घेऊ आणि यापैकी कोणता पर्याय कसा निवडावा? याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ.

म्युच्युअल फंड म्हणजे काय? What is Mutual Fund?

म्युच्युअल फंड योजना ही एक प्रकारची आर्थिक उपकरण आहे जे अनेक गुंतवणूकदारांकडून गोळा केलेल्या पैशांच्या संचाद्वारे बनवले जाते. AMC  म्युच्युअल फंड कंपन्यांद्वारे कंपनीचे शेअर्स, बाँड्स, स्टॉक्स, कर्जे आणि इतर मालमत्ता यासारख्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात. एएमसी या मुक्त गुंतवणूकीचे व्यवस्थापन करतात. म्युच्युअल फंड कंपन्या वेगवेगळ्या रोख्यांमध्ये निधीचे वाटप करतात. हे त्यांच्या गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीद्वारे त्यांची संपत्ती वाढवण्यास मदत करते.

ईटीएफ म्हणजे काय? What is ETF Fund?

ईटीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड (Exchange Traded Fund). हा म्युच्युअल फंड सारखाच गुंतवणुकीचा प्रकार आहे. ईटीएफ हे असे फंड आहेत जे शेअर मार्केटमधील इंडेक्सला फॉलो करतात. म्युच्युअल फंड आणि ईटीएफ मध्ये मुख्ये फरक म्हणजे ईटीएफ मध्ये रिअल टाइम ट्रेडिंग करता येते. कारण ईटीएफची किंमत मार्केटमधील चढ-उताराप्रमाणे बदलते. तर म्युच्युअल फंडचा एनएव्ही (NAV) दिवसाच्या शेवटी ठरते आणि ती किंमत दुसऱ्या दिवशी लागू होते.


ईटीएफ आणि म्युच्युअल फंड यांच्यातील समानता

ईटीएफ आणि म्युच्युअल फंड हे दोन गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या योजना आहेत. जरी ही दोन प्रोडक्ट्स वेगवेगळी असली तर त्यांच्यात बऱ्याच समानता देखील आहेत. अशाच काही समानता आपण समजून घेऊ.

डायव्हर्सिफिकेशन (Diversification)

ईटीएफ आणि म्युच्युअल फंड हे वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक किंवा ॲसेटनी मिळून बनतात. त्यावर त्यांचा परफॉर्मेन्स निर्धारित होतो. ईटीएफमध्ये अशा सिक्युरिटीज निवडल्या जातात. ज्या नियमितपणे ट्रॅक करून त्याची इंडेक्सिंग केली जाते. तर म्युच्युअल फंडचा फंड मॅनेजर जास्तीत जास्त परतावा मिळण्याच्या दृष्टीने बाजारातील स्थितीचा आढावा घेऊन त्यावर रिसर्च करून अत्यंत सावधगिरीने गुंतवणुकीसाठी कंपन्यांची/सेक्टरची/थीमची निवड करतो. 

व्यावसायिक व्यवस्थापन (Professional Management)

ईटीएफ आणि म्युच्युअल फंड या दोन्ही व्यावसायिकरित्या व्यवस्थापित केलेल्या योजना आहेत. ईटीएफ ही पॅसिव्ह ॲसेट (Passive Asset) आहे आणि यासाठी फंड व्यवस्थापकांच्या टीमची आवश्यकता नसते. म्युच्युअल फंड हे ॲक्टीव्ह फंड (Active Fund) असतात आणि गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा मिळण्यासाठी फंड व्यवस्थापकांची (Fund Manager) टीम कार्यरत असते.

कमी धोका (Low Risk)

ईटीएफ आणि म्युच्युअल फंडमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवणूक केली जाते. या दोन्ही पर्यायांमध्ये जमा होणारा निधी हा विविध ठिकाणी गुंतवला जातो. त्यामुळे एखाद्या योजनेचा परतावा चांगला नाही आला तर दुसऱ्या योजनेतून चांगला परतावा मिळू शकतो. ज्यामुळे संपूर्ण म्युच्युअल फंडाची जोखीम कमी होते. परिणामी गुंतवणूकदाराची जोखीमसुद्धा कमी होते.

Mutual fund vs ETF
 

ईटीएफ आणि म्युच्युअल फंडमधील फरक (Difference between ETF & MF)

आतापर्यंत आपण पाहिले की, ईटीएफ आणि म्युच्युअल फंड हे जवळजवळ समान गुंतवणुकीचे पर्याय आहेत; पण त्यांच्यात काही वेगळे फरक ही आहेत. हे आपण समजून घेऊ.

खर्च (Expenses)

ETF मध्ये गुंतवणूक केल्यानंतर त्याचे व्यवस्थापन करण्याची किंमत खूपच कमी आहे. कारण ते ॲक्टिव्ह फंड (Active Fund) नाहीत. त्यामुळे, म्युच्युअल फंडाच्या तुलनेत ईटीएफमधील गुंतवणुकीची किंमत किंवा खर्च खूपच कमी आहे.

कर लाभ (Tax Benefit)

ETF मध्ये त्यांच्या गुंतवणूक श्रेणीनुसार दीर्घ किंवा अल्पकालीन भांडवली नफा किंवा तोटा गणला जातो. त्यावरील टॅक्स साधारणत: म्युच्युअल फंडप्रमाणेच आकारला जातो.

पोर्टफोलिओ व्यवस्थापन  (Portfolio Management)

ईटीएफ हे पॅसिव्ह फंड (Passive Fund) आहेत. कारण ते फक्त त्यांच्या निर्देशांकाचा मागोवा घेतात आणि त्यातील विचलन शक्य तितके कमी करतात, ज्याला 'ट्रॅकिंग एरर' म्हणतात. म्युच्युअल फंड हे सक्रियपणे व्यवस्थापित केलेले फंड (Active Fund) आहेत; जे गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त परतावा देण्यासाठी फंड व्यवस्थापकाद्वारे सतत देखरेख आणि व्यवस्थापित केले जातात.

व्यापार (Trade)

ETF ची बाजाराच्या वेळेत शेअर्सप्रमाणे थेट व्यवहार करता येतात. त्यांना इंट्राडे ट्रेडिंगचाही (Intra-Day Trading) फायदा होतो. जो म्युच्युअल फंडमध्ये होत नाही. म्युच्युअल फंडात फक्त NAV किंवा AMC ने दिवसाच्या शेवटी घोषित केलेल्या 'क्लोजिंग प्राईस'च्या आधारावर व्यवहार करता येतो.