Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UPI for EMI: आता QR कोड स्कॅन करून भरता येणार EMI; ICICI बँकेने सुरू केली सुविधा

UPI for EMI

UPI for EMI: ICICI बँकेच्या ग्राहकांना UPI द्वारे पेमेंट करता येणार आहे. कुठल्याही स्टोअर मध्ये QR कोड स्कॅन करून आणि EMI मध्ये पेमेंट करून ग्राहक उत्पादने किंवा सेवा खरेदी करू शकतात.

आयसीआयसी बँकेने मंगळवारी (दि. 11 एप्रिल) QR कोड स्कॅन करून UPI वरून पेमेंटसाठी EMIची सुविधा सुरू केली. बॅंकेच्या 'Buy Now Pay Later' या सेवेसाठी पात्र असलेले ग्राहक या युपीआय EMI सुविधेची निवड करू शकतात. कोणतीही वस्तू खरेदी करतांना ग्राहकांना या सुविधेचा फायदा घेता येणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स, किराणा सामान, फॅशन, पोशाख, प्रवास आणि हॉटेल बुकिंगसारख्या अनेक श्रेणींमध्ये या सुविधेचा लाभ घेता येईल.

UPI चा वाढता वापर पाहून बँकेचा निर्णय

बँकेच्या खात्यामधून जास्तीत जास्त पेमेंट हे UPI द्वारे होत असल्याचे बॅंकेच्या लक्षात आले आहे. त्याचबरोबर ग्राहक बँकेच्या 'आता खरेदी करा, पैसे नंतर द्या' या सेवेसाठी UPI ​​पेमेंटची निवड करत आहेत. त्यामुळे बँकेने जाणीवपूर्वक ग्राहकांना हा पर्याय देण्याचा निर्णय घेतला आहे. 

2018 साली सुरू केली 'Buy Now Pay Latter सुविधा' 

ICICI बँकेने 2018 मध्ये ‘Buy Now Pay Later’ सुविधा सुरू केली. ज्यामुळे ग्राहकांना लगेच पैसे न देता डिजिटल आणि पेपरलेस पद्धतीने वस्तू खरेदी करता येत आहे. Pay Later या सुविधेमुळे ग्राहक ऑनलाईन खरेदी करू शकतात. बिल भरू शकतात आणि कोणत्याही व्यावसायिक UPI धारकाा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पैसे पाठवू  शकतात. हे पैसे  ग्राहक टप्प्याटप्प्याने ईएमआयद्वारे भरू  शकतो.  

असा घेता येईल या सुविधेचा लाभ

  • जवळच्या कोणत्याही स्टोअरमध्येजा आणि तुमच्या आवडची वस्तू निवडा
  • निवडलेल्या वस्तुचे पेमेंट करण्यासाठी, iMobile Pay अॅप वापरा 
  • अॅपमधील Scan QR Code हा पर्याय निवडा
  • व्यवहाराची रक्कम 10,000 रुपये किंवा त्याहून अधिक असल्यास Pay Later EMI हा पर्याय निवडा
  • त्यानंतर ईएमआयचा 3, 6 किंवा 9 महिने यापैकी योग्य पर्याय निवडा 

 अशाप्रकारे वरील प्रक्रियेनुसार तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता.