Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India Economy : EdTech बाजारपेठ येत्या सहा वर्षांत 300 अब्ज अमेरिकन डॉलरची होणार    

EdTech Company

शिक्षणाचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म (Online Education Platform) म्हणजे एडटेक (EdTech) क्षेत्र. कोव्हिडनंतरच्या काळात या क्षेत्राचा विस्तार अपेक्षित आहे. आणि येत्या 7 वर्षांत हे क्षेत्र 300 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत जाईल असा अंदाज एका अहवालात वर्तवण्यात आला आहे.

कोव्हिडच्या काळात (Covid19 Outbreak) ज्या क्षेत्राचा विकास आणि विस्तार झाला असं एक क्षेत्र म्हणजे ए़डटेक उद्योग (EdTech). मुलांच्या घरून शिक्षणाची सोय झाली. आणि त्याचबरोबर शिक्षणाचा अभ्यासक्रम ऑनलाईन उपलब्ध झाला. भारतात बायजू्ज (Byju) सारख्या कंपन्या या काळात नावारुपाला आल्या. आता हाच उद्योग येत्या 7 वर्षांमध्ये 300 अब्ज अमेरिकन डॉलरचा होईल असा अहवाल ब्लूम व्हेंचर्सने (Bloom Ventures) सादर केला आहे. हा जागतिक स्तरावरचा अंदाज आहे. या घडीला एडटेकची बाजारपेठ 101 अब्ज अमेरिकन डॉलरची आहे, असंही अहवालात म्हटलं आहे. भारतात मात्र अजूनही एडटेकची बाजारपेठ 6 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी लहान आहे. पण, कोव्हिडच्या सुरुवातीला ती फक्त 1 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती. भारतीय एडटेक कंपन्यांबद्दल या अहवालात एक महत्त्वाचं भाष्य करण्यात आलंय.     

‘कोव्हिडमुळे भारतात एडटेक कंपन्यांचा उदय झाला. आणि आता या कंपन्या फक्त भारतीय मुलांनाच नाही तर भारताबाहेरच्या मुलांनाही शिक्षणात मदत करत आहेत. म्हणजेच, या कंपन्यांची बाजारपेठ फक्त भारतापूरती मर्यादित नाही,’ असं निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आलंय. ब्लूम व्हेंचर्सच्या मुख्य अगवालात ‘भारतीय एडटेक 2022’ असा एक विभागही आहे. आणि तिथे भारतीय एडटेक बाजारपेठेविषयी आणि त्यातल्या भारतीय योगदानाविषयी बरीच माहिती आहे.     

एडटेक उद्योगासमोरचं आव्हान विविध वयोगटातील मुलांसाठी अभ्यासपर माहिती देण्याचं आहे. भारतात बारावी पर्यंतची मुलं एडटेक साधनांना सर्वाधिक वापर करत असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे या वयोगटातल्या मुलांसाठी एडचेक कंपन्यांनी 2.7 अब्ज अमेरिकन डॉलर खर्च केले आहेत. तर बारावीच्या पुढे कॉलेज आणि त्यापुढच्या तंत्रशिक्षणासाठी माहिती संकलन करण्यासाठी कंपन्यांनी 1.6 अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक केली आहे.     

आणखी एक महत्त्वाचं निरीक्षण म्हणजे भारतीय एडटेक कंपन्या सुरुवातीला भारतीय अभ्यासक्रमांवरच लक्ष केंद्रीत करत होत्या. पण, कोव्हिड नंतरच्या काळात भारतात हा उद्योग काहीसा मंदावला. या कालखंडात भारतीय एडटेक कंपन्यांनी भारताबाहेर अमेरिका, मध्य-पूर्व आशिया, दक्षिण आशियाई देश इथंही आपली सेवा द्यायला सुरुवात केली. आणि त्यांना यशही मिळत असल्याचं दिसतंय.     

बहुतेक भारतीय एडटेक कंपन्या स्टार्टअप आहेत. आणि अजूनही या क्षेत्रात भारतात गुंतवणूक होतेय.     

येणाऱ्या काळात लोकांना गेमिंगचं तंत्र आणि अॅनिमेशन तसंच वेब3 लर्निंग, कौशल्य विकास, तगडा बायोडेटा बनवण्याचं प्रशिक्षण आणि त्यासाठी नवीन तंत्र शिकणं यासारखे अभ्यासक्रम ऑनलाईन हवे आहेत, असं या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे विस्ताराबरोबरच या क्षेत्रात नोकरीच्या संधीही निर्माण होणार आहेत.     

रोजगारासाठी आवश्यक कौशल्य विकास अभ्यासक्रम चालवणाऱ्या ए़डटेक कंपन्यांची बाजारपेठ सध्या 500 दशलक्ष अमेरिकन डॉलरची आहे. इथून पुढे यात व्यक्तिमत्व विकास आणि सभाधीटपणा यासारख्या अभ्यासक्रमांची मागणी भारतात वाढत असल्यांचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सध्या अशा अभ्यासक्रमांची बाजारपेठ 450 दशलक्ष अमेरिकन डॉलरची आहे.     

आणि येणाऱ्या कालावधीत हा आकार वाढून तीनपट होणार आहे.