Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

जाणून घ्या प्रोविडेंट फंडमधील रक्कम क्लेम करण्याची सोपी पद्धत!

EPF CLAIM ONLINE

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) हा आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी केलेली एक सेव्हिंग असते. मूळ वेतनाच्या 12 टक्के रक्कम ही EPF अकाउंटमध्ये वळवली जाते. ही रक्कम तुम्ही तुमच्या सोयीनुसार घरबसल्या ऑनलाईन काढू शकता.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) भरणारे कर्मचारी त्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये (EPF) असलेली रक्कम ऑनलाईन पद्धतीने सहजपणे काढू शकतात. हे ईपीएफओच्या सदस्य ई-सेवा पोर्टलद्वारे केले जाऊ शकते. कर्मचार्‍यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या 12 टक्के दरमहा EPF खात्यात योगदान देणे आवश्यक आहे. कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर त्यांची संपूर्ण बचत काढू शकतात.


PF काढण्यासाठी लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे

UAN शी आधार लिंक करणे: PF खात्यात पैसे जमा करण्यासाठी आधार कार्ड UAN शी लिंक करणे अनिवार्य आहे. लिंकिंग ईपीएफओ पोर्टल किंवा उमंग अ‍ॅपद्वारे ऑनलाईन केले जाऊ शकते.

केवायसी प्रक्रिया

सेवेच्या पहिल्या पाच वर्षांत निधी काढणे देखील सरकारने बंधनकारक केले आहे.  केवायसीसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. ईपीएफओ, प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, खात्याची स्थिती ‘व्हेरिफाइड’ मध्ये बदलेल. 

पीएफ काढण्याची प्रक्रिया 

  1. https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ येथे UAN पोर्टलला भेट द्या
  2. तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा आणि पडताळणीसाठी कॅप्चा एंटर करा.
  3. आता ‘ऑनलाइन सेवा’ टॅबवर जा आणि ड्रॉप-डाउन मेनूमधून ‘क्लेम (फॉर्म-31, 19 आणि 10 सी)’ हा पर्याय निवडा.
  4. पुढील स्क्रीनवर, तुमचा बँक खाते क्रमांक प्रविष्ट करा आणि ‘व्हेरिफाय’ वर क्लिक करा.
  5. आता 'Yes' वर क्लिक करा आणि पुढे जा.
  6. यानंतर, ‘प्रोसीड फॉर ऑनलाइन क्लेम’ वर क्लिक करा.
  7. आता क्लेम फॉर्ममध्ये, 'मला अर्ज करायचा आहे' या टॅब अंतर्गत तुम्हाला आवश्यक असलेला दावा निवडा.
  8. तुमचा निधी काढण्यासाठी 'पीएफ अॅडव्हान्स (फॉर्म 31)' निवडा. आवश्यक रक्कम आणि कर्मचाऱ्याचा पत्ता द्या.
  9. आता, प्रमाणपत्रावर क्लिक करा आणि तुमचा अर्ज सबमिट करा.
  10. तुम्ही ज्या उद्देशाने फॉर्म भरला आहे त्यासाठी तुम्हाला स्कॅन केलेली कागदपत्रे सबमिट करण्यास सांगितले जाऊ शकते.
  11. नियोक्त्याने पैसे काढण्याची विनंती मंजूर केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या बँक खात्यात पैसे मिळतील. 
  12. बँक खात्यात पैसे जमा होण्यासाठी साधारणपणे 15-20 दिवस लागतात.

तीन महिन्यांसाठी मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या मर्यादेपर्यंत किंवा EPF खात्यात सदस्याच्या जमा झालेल्या रकमेच्या 75 टक्क्यापर्यंत रक्कम काढू शकता. सदस्य आपल्याला हव्या असलेल्या रकमेसाठी अर्ज ही करू शकतो.