कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने (EPFO) नुसार या वर्षाच्या सुरुवातीला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खातेधारकांसाठी नामांकन अनिवार्य करण्यात आले. हे नामांकन तुम्हाला कार्यालयात कागदपत्र सादर करून करता येईल. किंवा,ऑनलाईन सुध्दा नामांकन करू शकता. तसेच पूर्वी नामांकन केले असेल तर आणि त्यात बदल करायचा असल्यासही ऑनलाईन पद्धतीने नामांकन अपडेट करू शकता.
एकापेक्षा जास्त नॉमिनी ठेवण्याचा पर्याय
ईपीएफ (EPF) खातेधारकांना त्यांच्या खात्यांसाठी एकापेक्षा जास्त नॉमिनी ठेवण्याचा पर्याय आहे. ते प्रत्येक नामांकित व्यक्तीला रकमेचा वेगळा वाटा देखील देऊ शकतात. ई-नामांकन करण्यासाठी तुम्हाला ईपीएफओच्या संकेतस्थळावर लॉग इन करावे लागेल. यासाठी युएएन क्रमांक (UAN) असणे गरजेचे आहे. तसेच ज्यांना नॉमिनी ठेवणार आहेत त्यांचा फोटो, आधारकार्ड सुद्धा लागणार आहे.
ई नॉमिनेशन कसं कराल?
- https://epfindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला ला भेट द्या.
- Service मधील For Employees वर क्लिक करा.
- Member UAN/ online Service (OCS/OTP) टॅब वर क्लिक करा.
- UAN आणि पासवर्ड टाका.
- Manage टॅब वर क्लिक करून E- Nomination निवडा.
- Provide Details च्या टॅब वर क्लिक करा.
- कुटुंबाची माहिती देण्यासाठी Yes वर क्लिक करा.
- कौटुंबिक तपशील जोडा वर क्लिक करा
- तपशील भरल्यानंतर, सेव्ह ईपीएफ नामांकन वर क्लिक करा.
- OTP जनरेट करण्यासाठी ई-साइन वर क्लिक करा.
- आधार कार्डशी लिंक केलेल्या तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल.
- OTP सबमिट करा
- तुमची ई-नामांकन प्रक्रिया पूर्ण होईल.
प्रत्येक व्यक्तीच्या पगाराचा काही भाग पीएफ म्हणून दर महिन्याला कापला जातो. हे पैसे कर्मचाऱ्याला त्याच्या निवृत्तीनंतर दिले जातात. परंतु, अनेक वेळा खातेदाराच्या मृत्यूनंतर पीएफ खात्यात जमा केलेले पैसे खातेदाराच्या नॉमिनीला दिले जातात. परंतु, असे अनेक लोक आहेत ज्यांनी अद्याप त्यांच्या पीएफ खात्यात नॉमिनी जोडलेला नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते. हे नुकसान टाळण्यासाठी वरील पद्धतीचा अवलंब करून ई-नामांकन करू शकता.