तुमचं बजेट जास्त नसेल तर तुम्ही प्रमाणित प्री-ओन्ड कार खरेदी करू शकता. सोप्या अटी-शर्तींवर एसबीआय सर्टिफाइड प्री-ओन्ड कारसाठी वित्तपुरवठा करते. या योजनेत बँकेकडून किमान 3 लाख रुपये आणि जास्तीत जास्त 1 कोटी रुपयांचं कर्ज घेता येतं. एसबीआयच्या वेबसाइटवर यासंदर्भातली माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार, पगारदार, स्वयंरोजगार, व्यावसायिक, शेती आणि संबंधित कामं करत असलेले लोकदेखील सेकंड हँड कारसाठी कर्ज घेऊ शकतात. यामध्ये पगारदार, स्वयंरोजगार आणि व्यावसायिकांचं वार्षिक उत्पन्न 3 लाख किंवा त्याहून जास्त असावं. तर कृषी आणि त्यासंबंधीत कामं करणाऱ्यांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 4 लाख किंवा त्याहून अधिक असायला हवी. 21 ते 67 वर्षे वयोगटातले लोक या कर्जासाठी अर्ज करू शकतात.
Table of contents [Show]
किती कालावधीत परतफेड?
एसबीआयच्या सर्टिफाइड प्री-ओन्ड कार लोन स्कीम अंतर्गत किमान 3 लाख रुपये आणि कमाल 1 कोटी रुपयांचं कर्ज मिळणार आहे. कर्जाची परतफेड ग्राहकाला जास्तीत जास्त 5 वर्षांत करावी लागणार आहे. यामध्ये कारच्या एक्स-शोरूम किंमतीच्या 85 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकतं.
व्याजदर, प्रक्रिया शुल्क किती?
सर्टिफाइड प्री-ओन्ड कार लोन स्कीम अंतर्गत कर्जाचे व्याजदर 11.25 टक्के ते 14.75 टक्क्यांपर्यंत आहेत. तर प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 1.25 टक्के आणि जीएसटी समाविष्ट असेल. म्हणजेच कमाल 10,000 प्लस जीएसटी आणि किमान 3750 प्लस जीएसटी असं असू शकतं.
डॉक्यूमेंट्स कोणते?
एसबीआयच्या सर्टिफाइड प्री-ओन्ड कार लोन स्कीमसाठी अर्ज करताना तुम्हाला इनव्हॉइस प्रोफॉर्मा, विक्रेत्याच्या आरसीची प्रत, विक्रेत्याच्या मोटार विम्याची प्रत बँकेकडे सादर करावी लागेल. लोन डिस्बर्समेंटच्या वेळी नियमांनुसार, डीलर आणि विक्रेता यांच्यातला विक्री करार, डीलरकडून हमीपत्र, बँक क्लिअरन्स आणि विमा कंपनीशी झालेल्या चर्चेचा तपशील द्यावा लागेल. विमाधारकाचं नाव आणि फायनान्सर देणं गरजेचं आहे. याबद्दल बँक तुम्हाला सविस्तर माहिती देईल.
व्याज दराव्यतिरिक्त 2 टक्के मासिक दंड
इनकम इनव्हॉइस किंमत मारुती ट्रू व्हॅल्यू, ह्युंदाई एच-प्रॉमिस, होंडा ऑटो टेरेस, टाटा अॅश्युअर्ड, महिंद्रा फर्स्ट चॉइस यांसारख्या कंपन्यांकडून असायला हवी. त्यासोबतच डिफॉल्ट पिरियडमध्ये थकबाकीवरच्या विद्यमान व्याज दराव्यतिरिक्त 2 टक्के मासिक दंड भरावा लागेल. 1800-11-2211 या क्रमांकावर कॉल करून तुम्ही सविस्तर माहिती मिळवू शकता.