Best Car Loan: भारतात कार घेणाऱ्यांची संख्या वाढतेय. एकूण कार विक्रीपैकी 50% पेक्षा जास्त SUV खरेदीला ग्राहकांनी पसंती दिलीय. तसेच बजेट कारपेक्षा जास्तीत जास्त सुविधा आणि फिचर्स असलेल्या कार खरेदीकडे कल आहे. सहाजिकच त्यामुळं खरेदीचं बजेट वाढत आहे. कार खरेदीसाठी लोनचा पर्याय अनेकजण स्वीकारतात. आता दसरा-दिवाळी सण जवळ आल्यानं भारतीयांची कार खरेदी तेजीत राहण्याची शक्यता आहे.
मात्र, फक्त कोणती कार बेस्ट इथपर्यंत तुमचा रिसर्च न थांबवता कोणती बँक कमीत कमी व्याजदराने लोन देते हे सुद्धा तपासा. त्यामुळे मग इएमआयच्या रुपाने तुम्ही पैसे वाचतील. काही महिने ते 7 वर्षांपर्यंत तुम्हाला कार लोन मिळू शकते. या लेखात काही आघाडीच्या बँकांचे व्याजदर पाहूया.
स्वस्त वाहन कर्ज कुठे मिळेल?
SBI बँकेकडून वाहन कर्जावर 8.65 ते 9.75 इतका व्याजदर आकारला जात आहे. जर तुम्ही 5 लाख रुपये कर्ज 5 वर्षांसाठी घेतले तर तुम्हाला 10,562 पर्यंत EMI येऊ शकतो. बँकेकडून कर्जावर शून्य टक्के प्रोसेसिंग फी आकरली जात आहे.
ICICI बँकेकडून वाहन कर्ज 8.95 टक्क्यांपासून पुढे मिळत आहे. मात्र, प्रोसेसिंग शुल्क 999 ते 8,500 रुपये कर्जाच्या रकमेनुसार लागू होईल. तर HDFC बँकेकडून 8.75 टक्क्यांपासून पुढे वाहन कर्जावर व्याजदर आकारला जात आहे. एकूण कर्ज रकमेच्या 0.50% प्रोसेसिंग शुल्क आकारले जाईल. हे शुल्क 8 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते.
पंजाब नॅशनल बँकेकडून 8.75 ते 9.60 टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारला जात आहे. तसेच कर्ज रकमेच्या 0.25% टक्के प्रोसेसिंग फी आकारली जात आहे. कॅनरा बँकेद्वारे 8.80 ते 11.95 टक्के व्याजदर वाहन कर्जावर आकारला जात आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत कॅनरा बँकेने प्रोसेसिंग फी वर सूट दिली आहे. म्हणजेच शून्य टक्के प्रोसेसिंग फी आकारली जाईल.
कार लोन किती मिळू शकते?
कारच्या किंमतीच्या 90 टक्के किंमतीपर्यंत कर्ज अनेक बँकांकडून दिले जाते. मात्र, कर्जदाराची पात्रता, उत्पन्न, कर्ज फेडण्याची क्षमता यावर किती कर्ज मिळेल हे ठरते. तसेच क्रेडिट स्कोअर कमी असेल तर व्याजदर वाढू शकते तसेच कर्जही कमी मिळेल. याउलट जर चांगला क्रेडिट स्कोअर असेल तर कमी व्याजदराने जास्त कर्ज मिळू शकते.
750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर चांगला समजला जातो. कार लोनवर सहसा फिक्स्ड इंटरेस्ट रेट आकारला जातो. मात्र, कर्ज घेण्यापूर्वी बँकेकडून व्याजदर आणि शुल्कांबाबत सविस्तर माहिती घ्यावी.