Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI ची धमाकेदार फेस्टिव्हल सिझन ऑफर, 31 जानेवारी 2024 पर्यंत कार लोनवर नाही द्यावी लागणार प्रोसेसिंग फी

SBI Car loan offer

Image Source : www.onlinesbi.sbi

SBI ने कार लोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आणली आहे. येत्या 31 जानेवारी 2024 पर्यंत SBI ने कार लोनची प्रोसेसिंग फी न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दिवाळी आणि नवं वर्ष आता अगदी नजरेच्या टप्प्यात येऊन पोहोचलं आहे. अशात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आता देशातली सर्वात मोठी बँक SBI पुढे सरसावली आहे. एसबीआय कार लोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे. एसबीआयने आगामी 31 जानेवारी 2024 पर्यंत कार लोन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी प्रक्रीया शुल्क म्हणजेच प्रोसेसिंग फी (processing fee) न घेण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयच्या सोशल मिडियातल्या या पोस्टनंतर, 'या सणासुदीला आपल्या घरी घेऊन जा कार आणि कार लोन ऑफरचा मिळवा लाभ' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

काय आहे SBI कार लोन ऑफर?

एसबीआय बँकेच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार एसबीआय ऑटो लोनवर एका वर्षाचा MCLR लागू करते जो 8.55 टक्के इतका आहे.एसबीआय कोर लोनवर 8.80 ते 9.70 टक्क्यांच्या मध्ये व्याज घेतं. फिक्स्ड रेट इंट्रेस्टद्वारे संपूर्ण कार लोन कालावधी दरम्यान इट्रेस्ट रेट एकच असतो. कार लोनचा कालावधी 5 वर्षांपेक्षा जास्त असेल तर मात्र व्याजदरात वाढ होण्याची शक्यता असते. व्याज हे घटणाऱ्या कर्जाच्या रकमेवर आधारित असतं. एका वर्षानंतर कोणतंही प्रीपेमेंट चार्ज देण्याची गरज नसते.

कार लोनसाठी कोणती कागदपत्र असणं आवश्यक आहेत?

कार लोन घेण्यासाठी नोकरी करणाऱ्या व्यक्तींना 6 महिन्याची बँक स्टेटमेंट, 2 फोटो, आयडी प्रूफ, तुम्ही जिथे राहाता त्या ठिकाणचा दाखला (एँड्रेस प्रूफ), सॅलरी स्लीप, दोन वर्षांचा फॉर्म 16, (आयडी प्रूफमध्ये यापैकी काहीही एक गोष्ट द्यावी लागेल, पासपोर्ट,पॅन कार्ड, वोटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स)

(एॅड्रेस प्रूफ म्हणून राशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार कार्ड, पासपोर्ट, टेलिफोन बिल, लाईट बिल, विमा पॉलिसी)

बिझनेस क्लास व्यक्तींना कार लोनसाठी आवश्यक कागदपत्र कोणती?

6 महिन्यांची बँक स्टेटमेंट

2 पासपोर्ट साईझ फोटो

फोटो आयडी प्रूफ

एॅड्रेस प्रूफ

गेल्या दोन वर्षांचा आयटीआर

ऑडिटेड बँलन्स शीट