Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Multibagger Small cap stocks: वर्षभरात पैसे दुप्पट! बंपर परतावा देणारे 4 स्मॉल कॅप स्टॉक कोणते?

Multibagger Small cap stocks: वर्षभरात पैसे दुप्पट! बंपर परतावा देणारे 4 स्मॉल कॅप स्टॉक कोणते?

Multibagger Small cap stocks: भारतीय शेअर बाजारात सध्या तेजीचं वातावरण आहे. रोज नवनवे उच्चांक गाठले जात आहेत. अशात काही स्मॉल कॅप आणि मिड कॅप क्षेत्रात अनेक कंपन्या आहेत, ज्यांच्या शेअर्सनी बंपर असा जवळपास दुप्पट परतावा दिला आहे.

बुधवारी (28 जून) देशांतर्गत बाजार (Share market) विक्रमी पातळीवर बंद झालेला पाहायला मिळाला. गेल्या वर्षभरात बदलत्या वातावरणाचा भारतीय बाजारांवर मोठा परिणाम झाला. असं असतानाही गेल्या एका वर्षात बेंचमार्क निर्देशांक बीएसई (Bombay stock exchange) सेन्सेक्स आणि एनएसई (National stock exchange) निफ्टी यांचा परतावा जवळपास 20 टक्के इतका होता. बाजाराच्या या तेजीमध्ये स्मॉल कॅप (Small caps) आणि मिड कॅप (Mid caps) प्रकारातल्या अनेक कंपन्यांनी मल्टीबॅगर (Multibagger) परतावा दिला आहे. यामध्ये कल्याण ज्वेलर्स, केपीटी टेक, आयडीएफसी आणि आरबीएल बँक यांचा समावेश होतो. या समभागांनी फक्त वर्षभराच्या काळाता तब्बल 135 टक्क्यांपर्यंत बंपर परतावा दिला आहे. झी बिझनेसनं याचा आढावा घेतला आहे.

कल्याण ज्वेलर्स (Kalyan jewellers)

ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातल्या जेम्स, ज्वेलरी आणि घड्याळं या व्यवसायात ही कंपनी गुंतलेली आहे. कल्याण ज्वेलर्स या कंपनीचा परतावा मागच्या वर्षभरात 135 टक्के झाला आहे. 28 जून 2022ला शेअरची किंमत 60.45 रुपये होती. तर 28 जून 2023 रोजी स्टॉक 142वर बंद झाला. बीएसईवर कंपनीचं मार्केट कॅप 14,632 कोटी रुपये इतकं आहे.

केपीआयटी तंत्रज्ञान (KPIT tech)

आयटी सेक्टरमधली कंपनी केपीआयटीचा (KPIT Technologies Limited) परतावा गेल्या मागच्या वर्षभरात 112 टक्के राहिला आहे. 28 जून 2022 रोजी शेअरची किंमत 516.35 रुपये होती. तर 28 जून 2023 रोजी स्टॉक 1094.35वर बंद झाला. बीएसईवर कंपनीचं मार्केट कॅप 30,000.93 कोटी रुपये इतकं आहे.

आयडीएफसी (IDFC) 

आयडीएफसी ही एक वित्त क्षेत्रातली कंपनी आहे. या कंपनीचा परतावा मागच्या वर्षभरात 106 टक्के झाला आहे. 28 जून 2022 रोजी शेअरची किंमत 49.7 रुपये होती. तर 28 जून 2023 रोजी स्टॉक 102.25वर बंद झाला. बीएसईवर कंपनीचं मार्केट कॅप 16,359.84 कोटी रुपये इतकं आहे.

आरबीएल बँक (RBL Bank)

आरबीएल ही बँकिंग क्षेत्रातील कंपनी आहे. या बँकेचा परतावा गेल्या वर्षभरात 98 टक्के इतका राहिला आहे. 28 जून 2022 रोजी शेअरची किंमत 88.95 रुपये होती. तर 28 जून 2023 रोजी स्टॉक 175.95वर बंद झाला. बीएसईवर कंपनीचं मार्केट कॅप 16,359.84 कोटी रुपये इतकं आहे.

सेन्सेक्स-निफ्टीनं केला विक्रम

शेअर बाजारानं बुधवारी नवाच उच्चांक गाठल्याचं पाहायला मिळालं. बीएसई सेन्सेक्स 500 अंकांनी वाढून 63,915वर बंद झाला. निफ्टीही 154 अंकांच्या वाढीसह 18,972वर बंद झालेला दिसू आला. दोन्ही बेंचमार्क निर्देशांक पहिल्यांदाच एवढ्या उच्च पातळीवर बंद झाले. तर निफ्टीनं इंट्राडेमध्ये 19,011 आणि सेन्सेक्स 64,050चा लाइफटाइम उच्चांक बनवला. बाजारातल्या जोरदार तेजीमध्ये मेटल आणि फार्मा समभागांची स्टॉक्सची सर्वात जास्त खरेदी झाली. एनएसईवर निफ्टी फार्मा आणि मेटल इंडेक्स 1-1 टक्क्यांपेक्षा जास्त वाढून बंद झाले.

(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)