अॅसेट मॅनेजमेंट कंपनी 360 वन म्युच्युअल फंड जी आधी आयआयएफएल म्युच्युअल फंड म्हणून ओळखली जाणारी स्कीम होती. त्यामार्फत इक्विटीच्या प्रकारामध्ये 360 वन फ्लेक्सीकॅप फंड लॉन्च केला आहे. हा एनएफओ 12 जूनपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला आहे. 26 जून 2023 रोजी तो बंद होईल. फ्लेक्सी कॅप स्कीम्समध्ये फंड हाऊस तीनही प्रकारातल्या लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. ही एक ओपन एंडेड डायनॅमिक इक्विटी योजना आहे. याचाच अर्थ तुम्हाला जेव्हा योजनेतून बाहेर पडायचं असेल तेव्हा ते शक्य होणार आहे. त्याचा बेंचमार्क इंडेक्स एसअँडपी बीएसई 500 टीआरआय (S&P BSE 500 TRI) आहे.
Table of contents [Show]
कोणत्याही श्रेणीतले स्टॉक निवडण्याचे स्वातंत्र्य
फंड मॅनेजरला कंपनीच्या कोणत्याही श्रेणीतले स्टॉक निवडण्याचं स्वातंत्र्य असतं. कारण फ्लेक्सी-कॅप फंडांत गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळावा, हा यामागचा हेतू असतो. म्हणजेच फंड मॅनेजरच्या समोर विशिष्ट बाजार भांडवल असलेल्या कंपन्यांचेच स्टॉक घ्यावेत, असं काही बंधन नसतं. फंड मॅनेजरला वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार करण्यास यामुळे मदत होत असते.
दीर्घकालीन संपत्ती निर्मिती
ही फ्लेक्सी कॅप फंड 360 वन म्युच्युअल फंडाची योजना आहे. या 360 वन म्युच्युअल फंडाच्या मते, ही स्कीम दीर्घकालीन भांडवल वाढीच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांसाठी एक चांगला उपलब्ध करून देते. यामध्ये गुंतवणूकदारांना सर्व मार्केट कॅपसह इक्विटीशी संबंधित पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी असते.
65 टक्के गुंतवणूक इक्विटीमध्ये
फंड मॅनेजर बाजारातल्या ट्रेंडनुसार फंड बदलू शकतो, हे फ्लेक्सी कॅप फंडांचं मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणजे जर लार्ज कॅप चांगली कामगिरी करत असेल, तर फंड मॅनेजर लार्ज कॅपकडे वळतो. तर समजा मिड कॅप्स चांगली कामगिरी करत असतील तर मिड कॅपमध्ये गुंतवणूक केली जाते. यामुळे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत असतो. अर्थात एक महत्त्वाची बाब म्हणजे, यामध्ये खर्चाचं प्रमाण थोडं जास्त असू शकतं. या प्रकारात किमान 65 टक्के गुंतवणूक इक्विटीमध्ये असते.
ओपन एंडेडचे फायदे
अॅसेट मॅनेजमेंट कंपनी 360 वन म्युच्युअल फंडाची इक्विटी प्रकारामधली 360 वन फ्लेक्सीकॅप फंड ही एक ओपन एंडेड स्कीम आहे. यात गुंतवणूकदारांना फायदा असतो. त्याला वाटेल तेव्हा तो बाहेर पडू शकतो. यात केवळ ईएलएसएस स्कीम्समध्ये तीन वर्षांचा लॉक-इन पिरीयड असतो. या स्कीममधून जी युनिट्सची संख्या जारी करण्यात येते, ती अमर्यादित स्वरुपातली असते. आणखी एक फायदा म्हणजे एकरकमी गुंतवणूक या माध्यमातून करता येते. या स्कीममधला फंड स्टॉक एक्स्चेंजवर सहजासहजी वापरला जातो. ईएलएसएसचा तीन वर्षांचा लॉक-इन पिरीयड असतो. मात्र यात करलाभ मिळतो. या स्कीममध्ये फंड मॅनेजरचं नियंत्रण असतं. यासह अनेक फायदे गुंतवणूकदारांना मिळत असतात. त्यामुळे ते क्लोज एंडेड फंडांच्या तुलनेत अधिक फायदेशीर ठरतं.
(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)