जगभरात विस्तार असलेल्या दिग्गज अशा ई-कॉमर्स कंपनीने, फ्लिपकार्टने ग्राहकांना पर्सनल लोन देण्याची सुविधा सुरु करण्याची घोषणा केली आहे. आता तुम्ही म्हणाल की ऑनलाइन वस्तू विकणाऱ्या या कंपनीला वित्तीय सुविधा देण्याची गरज का भासली? अर्थात, हा एक बिजनेस आहे. नफा कमावणे हा कुठल्याही बिसनेसचा मुखू उद्देश असतो. फ्लिपकार्टने देखील मार्केट रिसर्च करून पर्सनल लोन देण्याचा निर्णय घेतला आहे.
45 कोटी ग्राहक
फ्लिपकार्टची भारतातील ग्राहकसंख्या खूप आहे. जवळपास 45 कोटी ग्राहकसंख्या असलेली ही कंपनी भारतीयांच्या पसंतीस उतरली आहे. या सर्व ग्राहकांना वस्तू खरेदी करण्यासाठी पैशांची गरज भासतेच. अनेकदा पैसे नसताना ग्राहक क्रेडीट कार्डचा वापर करतात आणि EMI वर म्हणजेच हफ्त्याने वस्तू खरेदी करतात. अशा व्यवहारांमध्ये क्रेडीट कार्ड सुविधा पुरविणाऱ्या बँकेचा अधिक फायदा होत असतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन थेट फ्लिपकार्टनेच ग्राहकांना पर्सनल लोन देण्याची योजना पुढे आणली आहे.
देशभरातील ग्राहकांना या योजनेचा फायदा होईल आणि त्यांच्या आर्थिक गरजा फ्लिपकार्टवरच पूर्ण होतील अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच फोन पे या कंपनीने वैयक्तिक कर्ज देण्याची सुविधा त्यांच्या ग्राहकांना उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर फ्लिपकार्टने देखील या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. फोन पे आणि फ्लिपकार्ट हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतील हे आता स्पष्ट झाले आहे.
Axis Bank Limited शी करार
फ्लिपकार्टने आजपासून त्यांच्या 45 कोटी ग्राहकांना वैयक्तिक कर्ज देण्यास सुरुवात केली आहे. Flipkart ने Axis Bank Limited सह याबाबत करार केला असून, त्यांच्या सहकार्याने ग्राहकांना लोन दिले जाणार आहे. फ्लिपकार्टने दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन मिळू शकणार आहे. लोन मिळवण्यासाठी ग्राहकांना कुठेही जाण्याची गरज भासणार नाही. घरबसल्या मोबाईलवर फ्लिपकार्टच्या ॲपद्वारे ग्राहकांना लोनसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे. KYC डीटेल्स देखील ऑनलाइनच चेक केले जाणार आहे.
कर्जाची परतफेड करण्यासाठी ग्राहकांना EMI चा ऑप्शन देण्यात येणार असून 6 महिन्यांपासून 36 महिन्यांपर्यंत परतफेडीचा कालावधी निवडता येणार आहे. पर्सनल लोन ग्राहकांना त्यांच्या सिबिल स्कोअरनुसारच मिळणार असल्याचे देखील फ्लिपकार्टने स्पष्ट केले आहे. व्याजदर देखील Axis Bank Limited च्या नियमानुसार आणि सिबिल स्कोअरनुसार दिले जाणार आहे.