Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Dreamfolks आयपीओची धमाकेदार लिस्टिंग; LIC नंतर प्रथमच आयपीओ मार्केटमध्ये चैतन्य!

Dreamfolks आयपीओची धमाकेदार लिस्टिंग; LIC नंतर प्रथमच आयपीओ मार्केटमध्ये चैतन्य!

Dreamfolks कंपनीचा शेअर एनएसई (National Stock Exchange) वर 56.04 टक्क्यांच्या प्रीमियमसह 508.70 रुपयांवर लिस्टिंग झाला.

Dreamfolks IPO Share Listing : विमानतळावर अॅग्रीग्रेटर सर्व्हिस देणारी एअरपोर्ट कंपनी ड्रीमफोल्कसच्या शेअर्सची (Dreamfolks Shares) आज धमाकेदार लिस्टिंग झाली. Dreamfolks चा शेअर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर (NSE) 56.04 टक्क्यांच्या प्रीमियमसह 508.70 रुपयांवर लिस्टिंग झाला. तर बीएसईवर (Bombay Stock Exchange-BSE) 54.91 टक्क्यांच्या प्रीमियमसह 505 रुपयांवर लिस्टिंग झाला. Dreamfolks कंपनीचा आयपीओची इश्यू प्राईस 326 रुपये होती. शेअर लिस्टिंग झाल्यानंतर यामध्ये चांगली तेजी दिसून येते. एलआयसी आयपीओनंतर (LIC IPO) प्रथमच आयपीओ मार्केटमध्ये चैतन्य दिसून आले. मधल्या काळात आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

ड्रीमफोल्कसचा आयपीओ सब्रस्क्रिप्शनसाठी 24 ते 26 ऑगस्ट या दरम्यान खुला होता. या कंपनीचे सगळे इश्यू विक्रीसाठी उपलब्ध होते. गुंतवणूकदारांकडून या आयपीओला चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि यात पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (Qualified Institutional Buyers-QIB) आरक्षित असलेल्या कोट्यातून सर्वाधिक म्हणजे 70.53 टक्के सब्रस्क्रीप्शन झाले. तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आरक्षित असलेल्या कोट्यातून 37.66 टक्के सब्रस्क्रिप्शन झाले आणि किरकोळ गुंतवणूकदारांकडून 43.66 टक्के नोंदणी करण्यात आली होती. ड्रीमफोल्कसच्या इश्यूसाठी 2 रुपये फेस व्हॅल्यूची प्राईस बॅण्ड 308 ते 326 रुपये प्रति शेअर इतकी ठरवण्यात आली होती आणि यातून कंपनीने किमान 562 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा मानस व्यक्त केला.

DreamFolks Services Share Price
Image Source:Moneycontrol.com

पीटर कलाट, दिनेश नागपाल आणि मुकेश यादव या कंपनीच्या प्रमोटर्सनी ऑफर फॉर सेल (Offer for Sale) मध्ये 1,72,42,368 शेअर्सची विक्री केली. DreamFolks Servicesने अँकर गुंतवणूकदारांकडून 253 कोटी रुपये जमा केले.