Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ड्रीमफोक्स सर्व्हिसेस IPO: 'ग्रे मार्केट' प्रिमियम वाढला, आपण खरेदी करावे का?

DreamFolksIPO

DreamFolks IPO Last Day: विमानतळांवर लाऊंज सेवा देणाऱ्या ड्रीमफोक्स सर्व्हिसेसचे समभाग खरेदीसाठी आज शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत या आयपीओचा किरकोळ गुंतवणूकदारांसाठीचा राखीव हिस्सा 19.1 पटीने सबस्क्राईब झाला आहे.या पब्लिक इश्यूमधून कंपनी 562 कोटींचे भांडवल उभारणार आहे.

ड्रीमफोक्स सर्व्हिसेससाठी (DreamFolks Services IPO) गुंतवणूक करण्याचा आज 26ऑगस्ट रोजी शेवटचा दिवस आहे. मागील दोन दिवसांत या आयपीओला गुंतवणूकदारांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.कंपनीने अॅंकर गुंतवणूकदारांकडून 253 कोटी उभारले आहेत. त्यामुळे आयपीओमधून इश्यू होणाऱ्या शेअर्सची संख्या 94.83 लाख करण्यात आली आहे. यापूर्वी कंपनी पब्लिक इश्यूमधून 1.72 कोटी शेअर्स विक्री करणार होती. (DreamFolks IPO subscribed 9x on last day)
 
विमान प्रवाशांना विविध लाऊंज सेवा, फूड बेव्हरेजेस, स्पा, एअरपोर्ट ट्रान्सफर, हॉटेल व्यवस्था आणि बॅगेज ट्रान्सफर अशा सुविधा ड्रीमफोक्सकडून पुरवल्या जातात. आजच्या घडीला ड्रीमफोक्स सर्व्हिसेस ही लाऊंज सेवा देणारी आघाडी कंपनी आहे. कंपनीने IPO साठी प्रती शेअर 308-326 रुपये असा प्राईस बॅंड निश्चित केला आहे. वैयक्तिक गुंतवणूकदारांना किमान 46 शेअरसाठी बोली लावता येईल. ड्रीमफोक्स सर्व्हिसेसची येत्या 6 सप्टेंबर 2022 रोजी बीएसई आणि एनएसईवर नोंदणी होणार आहे.

गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद

ड्रीमफोक्स सर्व्हिसेसचा आयपीओ 24 ऑगस्ट  2022 रोजी खुला झाला होता. त्याला किरकोळ गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या दोन दिवसांत IPO 9 पटीने सबस्क्राईब झाला होता. यातील रिटेल पोर्शन (किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा) 19.1 पटीने सबस्क्राईब झाला. नॉन इन्स्टीट्युशनल इनव्हेस्टरकडून 8.4 पट शेअर्ससाठी बोली लावली आहे. क्वालिफाईड इन्स्टीट्युशनल बायर्ससाठीचा राखीव हिस्सा 60% भरला आहे.

ग्रे मार्केटमध्ये ड्रीमफोक्सचा शेअर तेजीत (DreamFolks Services GMP Rise)

ड्रीमफोक्स सर्व्हिसेसच्या आयपीओला मिळालेल्या प्रतिसादाने कंपनीचा शेअर ग्रे मार्केट तेजीत आहे. आज शुक्रवारी 26 ऑगस्ट 2022 रोजी ग्रे मार्केटमध्ये ड्रीमफोक्स सर्व्हिसेसचा ग्रे मार्केट प्रिमियम (GMP) 60 रुपयांवरुन 83 रुपये इतका वाढला आहे. शेअरची मागणी वाढत असल्याने ग्रे मार्केट प्रिमीयम(GMP) वाढत असल्याचे शेअर बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे.

ड्रीमफोक्स सर्व्हिसेस IPO मध्ये गुंतवणूक करावी का? काय सांगतात ब्रोकर्स

  • ड्रीमफोक्स सर्व्हिसेस IPO ला आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीचा ग्रे मार्केट प्रिमियम वाढत असला तरी तो इश्यू प्राईसच्या तुलनेत जादा किंमतीवर लिस्ट होईल हे सांगणे कठिण असल्याचे ब्रोकर्सचे म्हणणे आहे. सकारात्मक नोंदणीसाठी ग्रे मार्केट प्रिमियम हे इंडिकेटर होऊ शकत नाही.
  • आनंद राठी सिक्युरिटजने ड्रीमफोक्स सर्व्हिसेसमध्ये दिर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी सबस्क्राईब करण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीची सेवा ही इतरांपेक्षा वैविध्यपूर्ण असून दिर्घकाळात चांगली वृद्धी दिसून येईल, असे आनंद राठी सिक्युरिटीजने म्हटलं आहे.
  • आयसीआयसीआय सिक्युरिटीजने ड्रीमफोक्स सर्व्हिसेसच्या आर्थिक वर्ष 2022  बाजारमूल्याबाबत शंका व्यक्त केली आहे. 2023 मध्ये व्यावसायिक परिस्थिती सुधारली तर आर्थिक कामगिरी उंचावेल, असे म्हटलं आहे.
  • अॅंजल वन आणि केआर चोक्सी सिक्युरिटीज या ब्रोकरेज कंपन्यांनी ड्रीमफोक्स सर्व्हिसेसच्या IPO मध्ये अर्ज करण्याचा सल्ला दिला आहे.