सरकारकडून आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. त्याप्रमाणेच राज्य शासनाकडून डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना नेमकी काय आहे. याचे स्वरूप, अर्ज करण्याची प्रक्रिया याबाबतची माहिती आज आपण जाणून घेऊया...
काय आहे पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना ?
राज्य सरकारकडून आर्थिक दृष्ट्या मागास (EBC) असलेल्या आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारितील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना ( Panjabrao Deshmukh Hostel Bhatta Yojana)सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरी भागात येतात. त्यापैकी जे विद्यार्थी आर्थिक दृष्टया दुर्बल आहेत. त्या विद्यार्थ्यांना कोणत्याही महाविद्यलय,विद्यापीठ अथवा शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळाल्यास त्या विद्यार्थ्यांना वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेद्वारे अर्थसहाय्य केले जाते.
किती मिळतो भत्ता-
पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह निधी योजनेतून पात्र विद्यार्थ्यांना पुढील प्रमाणे अर्थ सहाय्य दिले जाते (महानगरात शिक्षण घेण्यासाठी)
अल्पभूधारक -नोंदणीकृत मजूरांचे पाल्य
- व्यावसायिक शिक्षण - 30 हजार रुपये
- इतर क्षेत्रातील शिक्षण - 20 हजार रुपये
8 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असल्यास
- व्यावसायिक शिक्षण - 10 हजार रुपये
- इतर क्षेत्रातील शिक्षण - 08 हजार रुपये
योजनेसाठी पात्रता -
- अर्जदार हा बारावी उत्तीर्ण असावा.
- विद्यार्थ्याने केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (CAP) माध्यामातून प्रवेश घेतलेला असावा. (व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण)
- डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता या योजेनेचा लाभ घेणारा विद्यार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
- तसेच अर्जदार हा आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (EBC) असावा
- अर्जदाराच्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न वार्षिक 8 लाख रुपयांच्या आत असावे.
- अर्ज करताना उत्पादानाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.
- तसेच विद्यार्थ्यांचे पालक मजूर असल्यास मजुर नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- वसतिगृह निर्वाह भत्त्यासाठी एका कुटुंबातील दोन विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल.
डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन फॉर्म भरणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज सादर करावा.