इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत जवळ येत आहे आणि प्रत्येक नोकरदार अथवा आयटीआर (Income Tax Return-ITR) भरण्यास पात्र व्यक्ती आयटीआर फाईल करण्यासाठी आवश्यत कागदपत्रे गोळा करत आहे. आयटीआर दाखल करण्यासाठी आधार आणि पॅन कार्ड ही दोन अत्यंत आवश्यक कागदपत्रे आहेत. परंतु या आपत्कालीन परिस्थितीत, जर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड हरवले असेल अथवा मिळत नसेल, तर अशा वेळी तुम्ही पॅनकार्ड कुठे मिळवाल त्याची प्रोसेस काय आहे. याबाबतची माहिती आज आपण जाणून घेऊयात.
आयकर विभागाच्या संकेतस्थळावरून ई पॅन कार्ड मिळवा (E-Pan card)
आयटीआर (ITR) भरण्याची 31 जुलै ही 2023 ही अंतिम दिनांक आहे. त्या आधी तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे असायला हवीत. त्यामध्ये तुमचे पॅन कार्ड(Permanent Account Number-PAN) हे एक महत्त्वाचे डॉक्युमेन्ट आहे. तुम्ही पॅनकार्ड उपलब्ध नसेल तर तुम्ही तत्काळ आयकर विभागाच्या संकेतस्थळावरून ई पॅन कार्ड (E-Pan card) डाऊनलोड करू शकता.आयकर विभागाच्या वतीने ग्राहकांना ई-पॅन डाऊनलोड करण्यासाठी संकेतस्थळावर फिचर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच जर एखाद्याचे पॅन कार्ड हरवले असेल तर ते काही सोप्या स्टेपसह सहजपणे E-Pan डाऊनलोड करू शकतात.
ई-पॅन कसे डाऊनलोड करायचे ते पाहूया
- ई पॅन डाऊनलोड करण्यासाठी प्रथम आयकर विभागाच्या https://www.incometax.gov.in वेबसाईटवर जा.
- तुम्ही वेबसाईटवर तुमची नोंदणी केली नसल्यास Yourself या पर्यायावर क्लिक करा
- तुम्ही आधीच नोंदणी केलेली असेल अथवा नव्याने नोंदणी केल्यानंतर लॉग इन करा.
- वेबसाईटवर लॉग ईन केल्यावर साइटवरील "ई-पॅन" विभागात जा
ई-पॅनचा पर्याय निवडून तपशील कसे सबमिट करावे
- तुम्हाला ई-पॅन पेजवर “नवीन पॅन”(NEW PAN) किंवा “पॅन कार्ड पुनर्मुद्रण” (PAN REPRINT) पर्याय निवडा.
- तुमच्याकडे आधीच हरवलेले पॅन कार्ड असल्यास, “पॅन कार्ड रीप्रिंट” हा पर्याय निवडा.
- यासाठी तुमची जन्मतारीख, कॅप्चा कोड, पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि इतर संबंधित माहिती भरा
- संपूर्ण तपशील भरून सबमिट करा.
- तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल.
- ओटीपी टाकून पडताळणी करा.
ई-पॅनसाठी भरावे लागणारे शुल्क
- पडताळणी पुर्ण झाल्यानंतर तुम्हाला ई-पॅनसाठी शुल्क देखील भरावे लागेल.
- साधारणत: सुमारे 50 रुपये शुल्क घेतले जाते, परंतु ते थोडे जास्त किंवा कमी असू शकते.
- फी भरणे यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ओळखीची पुष्टी करणारा एक त्वरित संदेश प्राप्त होईल.
- यानंतर तुमचा नोंदणीकृत ईमेल तपासण्यासाठी ई-पॅन पृष्ठावर परत या.
- तुमच्या ईमेलमध्ये तुम्हाला ई-पॅन डाउनलोड करण्यासाठी लिंक मिळेल.
- या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचा ई-पॅन PDF फॉरमॅटमध्ये डाउनलोड करू शकता.
अशा प्रकारे जर तुमचे पॅनकार्ड हरवले किंवा विसरले तर काळजी करण्याची गरज नाही. काही मिनिटांत ई-पॅन मिळविण्यासाठी या माध्यमातून तुम्ही तुमचे ई पॅन कार्ड मिळवू शकता.