भारतीय पोस्ट विभागाने, सुरक्षित योजनांमध्ये पैसे गुंतवणूक करणाऱ्यांसाठी गुंतवणुकीच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. ज्यांना अधिक जोखीम घेणे आवडत नाही, तसेच त्यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याची भीती वाटते. त्यांच्या पोस्टाने सुरक्षित बचतीचा एक चांगला पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
पोस्टाच्या विविध योजनांचा लाभ घेताना यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बचत योजनांना भारत सरकारचा पाठिंबा आहे. त्यामुळे या योजना पूर्णत: सुरक्षित मानल्या जातात. तसेच या योजनेचा आणखी फायदा म्हणजे इन्कम टॅक्स विभागाच्या कलम 80C अंतर्गत टॅक्स सवलत मिळते. पोस्टाच्या विविध योजनांना 80C अंतर्गत टॅक्स बेनिफिटचा लाभ घेता येतो. आज आपण पोस्टाच्य अशाच महत्त्वाच्या योजनेचा आढावा घेणार आहोत. किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra-KVP). ही योजना सर्वप्रथम 1988 मध्ये सुरू करण्यात आली होती. यावर 6.9 टक्के व्याज दिले जाते. याची आणखी काही वैशिष्ट्ये आपण तपशीलाने पाहत आहोत.
1. व्याजदर (Interest Rate)
किसान विकास पत्र (KVP) बचत योजनेवर 6.9 टक्के व्याज दर दिले जाते. तसेच ते वार्षिक चक्रवाढ व्याज आहे. या योजनेत गुंतवलेली रक्कम 10 वर्षे आणि 4 महिन्यांत दुप्पट होते. यासाठी किमान 1 हजार रूपये गुंतवावे लागतात. तर कमाल मर्यादा यासाठी नाही.
2. कोण पात्र आहे? (Eligibility)
भारतीय पोस्टाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, पात्र गुंतवणूकदारांमध्ये पुढील व्यक्तींचा समावेश होतो.
- वैयक्तिक प्रौढ व्यक्ती
- संयुक्त खाते (3 प्रौढ व्यक्तींपर्यंत)
- 10 वर्षांखालील व दिव्यांग मुलांच्यावतीने पालक
- 10 वर्षांहून अधिक वय असलेले मूल
- या योजनेअंतर्गत कितीही खाती उघडता येतात, हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे.
3. मॅच्युरिटी (Maturity)
या योजनेत पैसे जमा केल्यापासून सरकारद्वारे वेळोवेळी ठरवलेल्या कालावधीनुसार या योजनेतील पैसे मॅच्युर्ड होतात. साधारणत: ही योजना 124 महिन्यांत मॅच्युर्ड होते आणि याचा लॉक-इन कालावधी 30 महिन्यांचा आहे.
खालील अटींच्या अधीन राहून केव्हीपी (KVP) खाते मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते:
- एकाच खात्याच्या किंवा संयुक्त खात्यातील कोणत्याही किंवा सर्व खातेधारकांच्या मृत्यूनंतर
- गॅझेट ऑफिसरच्या आदेशाने जप्त केल्यावर
- न्यायालयाने आदेश दिल्यावर
- पैसे जमा केल्याच्या तारखेपासून 2 वर्षे आणि 6 महिन्यांनंतर.
4. खात्याचे हस्तांतरण (Account Transfer)
KVP खाते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे फक्त खालील अटींनी ट्रान्सफर होऊ शकते:
- नामनिर्देशित व्यक्ती (Nominated Person) /कायदेशीर वारसांना खातेधारकाच्या मृत्यूनंतर
- खातेदाराच्या मृत्यूनंतर ते संयुक्त खातेधारकाच्या नावावर
- न्यायालयाच्या आदेशानुसार
- निर्दिष्ट प्राधिकरणाकडे खाते तारण ठेवल्यावर
या योजनेतील गुंतवणूकदार सुरक्षित कर्ज मिळविण्यासाठी त्यांचे KVP प्रमाणपत्र गहाण ठेवू शकतात. अशा कर्जासाठी व्याजदर तुलनेने कमी असतो.
image source -https://bit.ly/3ykRYt2