• 04 Oct, 2022 15:54

Amazonचा महामेगा सेल; हजारो रूपयांचा डिस्काऊंट!

shopping amazon sale

Amazon Prime Day Sale on 23 & 24 July : अॅमेझॉनच्या दोन दिवसांच्या मेगा सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह अनेक वस्तूंवर बंपर डिस्काऊंट मिळणार आहे.

Amazon Prime Day Sale on 23 & 24 July : अॅमेझॉनचा 23 आणि 24 जुलै असा दोन दिवसांसाठी प्राईम डे सेल असणार आहे. या मेगा सेलमध्ये इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेटसह अनेक वस्तूंवर बंपर डिस्काऊंट दिला जाणार आहे. तुम्ही जर स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, हेडफोन विकत घेणार असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे.

अॅमेझॉनवर 23 आणि 24 जुलैला प्राईम डे सेल (Prime Days sale) सुरू होणार आहे. 2 दिवस चालणाऱ्या या प्राईम सेलमध्ये वेगवेगळ्या वस्तूंवर डिस्काऊंटतर दिला जाणार आहेच; पण त्याचबरोबर ग्राहकांना वेगवेगळ्या बँक ऑफर्सचा फायदा देखील मिळणार आहे. ऑफर्समध्ये समाविष्ट असलेल्या बँकेच्या क्रेडिट व डेबिट कार्डने पेमेंट केल्यास ग्राहकांना कॅशबॅकसह काही उत्पादनांवर विशेष सवलतही मिळू शकते. 


स्मार्टफोनवर 40 टक्क्यांपर्यंत सवलत!

Amazon Prime Days सेलमध्ये मोठमोठ्या मोबाईल कंपन्यांचे स्मार्टफोन अगदी अर्ध्या किमतीत खरेदी करण्याची संधी मिळू शकते. याबाबत Amazon ने अजून ऑफर्स खुली केलेली नाही. पण येत्या काही दिवसात याबाबतची माहिती अॅमेझॉनकडून लवकरच दिली जाईल. काही स्मार्टफोनवर 40 टक्के डिस्काऊंट मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, नो-कॉस्ट ईएमआय (No cost EMI) आणि एक्सचेंज ऑफर्स (Exchange Offers) सुद्धा असणार आहे.

काही दिवसांपूर्वीच लॉण्च झालेल्या iQoo Neo 6 5G वर देखील प्राईम सेलमध्ये ऑफर मिळू शकेल. iQoo Neo च्या 8 जीबी रॅमच्या फोनची बाजारातील किंमत 29,999 रुपये आहे. सध्या OnePlus 10 Pro 5G ची किंमत 66,999 रुपये आणि सॅमसंगच्या Galaxy S20 FE ची किंमत 36,990 रुपये आहे. ग्राहक Amazon सेलमध्ये OnePlus Nord CE 2 Lite 5G आणि iQoo Z6 5G सारख्या काही बजेट व मिड-बजेट स्मार्टफोनला देखील स्वस्तात खरेदी करू शकतात.

इथे तुम्हाला ब्लूटूथ हेडफोनवर 70 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. याशिवाय, Sony WF-1000XM4 वर देखील बंपर डिस्काऊंट मिळेल. तसेच Realme Buds Wireless 2, Vivo TWS 2E आणि Boult Powerbuds TWS यावर सुद्धा भरघोस डिस्काऊंट मिळण्याची शक्यता आहे.

Amazon च्या मेगा सेलमध्ये अ‍ॅमेझॉनच्या स्वत:च्या उत्पादनांवर 55 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. यात नवीन इको डॉटला (4 जेनरेशन, ब्लॅक), अ‍ॅलेक्सा वॉईस रिमोटसह फायर टीव्ही स्टिक अत्यंत कमी किमतीत विकत घेऊ शकता. तसेच 6 इंच डिस्पले असलेला किंडल, ज्याची बाजारात 8 हजार रूपये किंमत आहे. तो तुम्हाला इथे 7 हजार रूपयांपेक्षा कमी किमतीत मिळू शकतो.