• 24 Sep, 2023 05:37

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Personal Loan : पहिल्यांदाच वैयक्तिक कर्ज काढत आहात का? 'या' चुका टाळा

Personal Loan : पहिल्यांदाच वैयक्तिक कर्ज काढत आहात का? 'या' चुका टाळा

Image Source : www.dezerv.in

विवाह, शिक्षण खर्च, घराचे नूतनीकरण यासारख्या विस्तृत गरजांसाठी किंवा आरोग्य विषयक आर्थिक आणीबाणी हाताळण्यासाठी वैयक्तिक कर्जाचा पर्याय उपयुक्त ठरू शकतो. मात्र, जर तुम्ही पहिल्यांदाच वैयक्तिक कर्जासाठी अर्ज (Personal Loan Application) करत असाल तर पुढील काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.

Personal Loan : आर्थिक अडचणी या कधी सांगून येत नाहीत. त्यामुळे आपल्याकडे आपत्कालीन निधीची तरतूद असायला हवी. मात्र, बऱ्याच जणांकडून याबाबत गांभीर्याने विचार केला जात नाही आणि तहान लागेल तेव्हा विहीर खोदण्याचे प्रकार सुरू होतात. दरम्यान, अशा प्रकारच्या अघोषित आणीबाणीच्या काळात बचतीचा पैसा नसेल तर बरेच लोक वैयक्तिक कर्जाचा (Personal Loan) पर्याय निवडतात. तुम्हालाही पहिल्यांदाच अशा प्रकारे वैयक्तिक लोन काढण्याची वेळ आली तर तुम्हाला कर्ज घेताना होणाऱ्या काही चुका टाळता आल्या पाहिजेत..

विवाह, शिक्षण खर्च, घराचे नूतनीकरण यासारख्या विस्तृत गरजांसाठी किंवा आरोग्यविषयक आर्थिक आणीबाणी हाताळण्यासाठी वैयक्तिक कर्जाचा पर्याय उपयुक्त ठरू शकतो. मात्र, वैयक्तिक कर्जासाठी अर्ज (Personal Loan Application) करण्यापूर्वी अर्जदाराने पूर्ण विचारकरून या कर्जासाठी अर्ज केला पाहिजे.अर्ज प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या चुका टाळल्या पाहिजेत, नाहीतर तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो. याशिवाय अन्य काही चुकांमुळे कशाप्रकारे नुकसान होऊ शकते ते पुढील मुद्द्यातून आपण समजून घेऊयात...

वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करताना टाळायाच्या चुका

क्रेडिट स्कोअर न तपासणे

ज्यावेळी तुम्हाला पर्सनल लोन काढण्याची आवश्यकता भासते आणि तुम्ही कर्जाच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण करता. त्यावेळी तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर चेक (credit score check) करणे अत्यंत गरजेचे आहे. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असणे गरजेचे आहे. त्यावरच तुमच्या कर्जाची रक्कम आणि मंजुरी होण्याची शक्यता ठरलेली असते. त्यामुळे क्रेडिट स्कोअर न तपासता अर्ज करू नका.

पर्याय आणि तुलनात्मक पडताळणी न करणे

तुम्हाला आपत्कालीन परिस्थिती पैशाची गरज पडते त्यावेळी वैयक्तिक कर्जसाठी अर्ज करण्यापूर्वी कोणकोणत्या वित्तीय संस्था वैयक्तिक कर्ज देत आहेत. त्यांचे व्याजदर किती आहेत. याशिवाय कर्जाच्या इतर कोणत्या सुविधा आहेत, ओव्हरड्राफ्टची सोय उपलब्ध आहे का? याची पडताळणी न करता अर्ज करणे काही वेळा महाग पडू शकते. तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.त्यामुळे वित्तीय बाजारातील सर्वोत्तम ऑफरचा शोध घेतला पाहिजे. कर्जासाठी आकारले जाणारे व्याज दर, फी, अटीची माहिती न घेणे, कर्जांची तुलना न करणे नुकसानीचे ठरू शकते.

नियम अटीकडे डोळेझाक करणे

कोणत्याही कर्जाच्या व्यवहरासाठी अर्ज करत असताना तुम्ही संबंधित संस्थेच्या नियम अटी वाचने किंवा जाणून घेणे गरजेचे आहे.जर तुम्ही त्याकडे डोळेझाक केली तर तुम्हाला काही वेळा नियमांमुळे आर्थिक फटका बसू शकतो. यासाठी कर्जा प्रक्रियेचे शुल्क, परतफेडीचे पर्याय, मुदतपूर्व कर्जफेडीचे आकारले जाणारे शुल्क, हप्ता चुकल्यास आकारला जाणारा दंड यासह इतर अटी व शर्ती वाचणे आणि समजून घेणे महत्त्वाचे आहे.

परतेफडीचे नियोजन न करणे-

तुम्हाला आपत्कालीन स्थितीत कर्ज घ्यायची वेळ आली तरीही कर्ज घेण्यापूर्वी तुम्ही कर्जाच्या परतेफेडीचे नियोजन करणे गरजेचे आहे. जर तुम्ही कर्ज परतफेड करण्यासाठी काहीच नियोजन नाही केले तर तुम्हाला कर्जाचे हप्ते भरण्यासाठी कसरत करावी लागू शकते. शिवाय  कर्जाचा हप्ता चुकल्यास अधिकचा दंड द्यावा लागू शकतो. तसेच वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करताना तुम्हाला किती पैशाची गरज आहे, त्याचे नियोजन करूनच कर्ज स्वीकारा. गरजेपेक्षा जास्त कर्ज मिळत असेल तरीही तो घेण्याचा मोह टाळा.

अशा प्रकारे बारीक सारीक चुका टाळून तुम्ही पूर्व तयारीने वैयक्तिक कर्ज घेतल्यास तुम्हाला परतफेडीसाठी ते सोयीचे होऊ शकते. शिवाय तुमचा होणारा अनावश्यक खर्च देखील टाळता येऊ शकतो.