कोणतीही गुंतवणूक करताना कालमर्यादा हा महत्त्वाचा घटक आहे. अल्प काळ म्हणजेच तीन महिने किंवा एक वर्षापर्यंतच्या काळात केलेल्या गुंतवणुकीतून मिळणारा फायदा कमी असू शकतो. मात्र, जेव्हा तुम्ही दीर्घ काळ म्हणजे, पाच, दहा किंवा पंधरा वर्षांसाठी गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला जास्त परतावा मिळतो. अल्पकाळ गुंतवणुकीत चढउतार पाहायला मिळतात. मात्र, दीर्घ काळ गुंतवणूक करताना अर्थव्यवस्था विकासाच्या दिशेने असते. त्यामुळे गुंतवणुकदारांना त्याचे फायदे मिळतात.
दीर्घ काळ गुंतवणुकीचे फायदे -
दीर्घकाळ गुंतवणुकीत धोका असतो का? याबद्दल पाहू आता. जेव्हा तुम्ही गुंतवणुकीचा विचार करता तेव्हा तुम्ही दीर्घ काळाचा विचार केला पाहिजे. कारण, अल्प कालावधीत बाजार वरखाली होऊ शकते. मात्र, त्याच वेळी जर तुम्ही गुंतवणूक काढून घेतली तर तुम्हाला जास्त परतावा मिळणार नाही. मात्र, याऊलट तुम्ही दीर्घकाळ बाजारात टिकून राहिलात तर तुम्हाला तात्पुरते आलेल्या धोक्यांपासून घाबरण्याची गरज नाही. कारण सरासरी काढली तर दीर्घ काळात तुम्हाला अर्थव्यवस्थेच्या विकासाबरोबर चांगला परतावा मिळतो.
किती काळ गुंतवणूक असायला हवी -
प्रत्येक म्युच्युअल फंडच्या कॅटेगरीनुसार गुंतवणूक किती वर्ष करत आहात यात बदलत होऊ शकतो. तसेच तुमचे गुंतवणुकीचे ध्येय काय आहे यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. जसे की, तुम्हाला मुलांच्या शिक्षणासाठी किंवा निवृत्तीसाठी पैसे हवे आहेत त्यासाठी तुम्ही कमीत कमी वीस पेक्षा जास्त वर्षांसाठी गुंतवणूक कराल. या परिस्थिती तुम्हाला चांगला परतावा मिळेल. इक्विटीमध्ये केलेली गुंतवणूक भांडवल बाजाराच्या परिस्थितीवर अवलंबून असेल, मात्र, दीर्घ काळामध्ये गुंतवणूक वाढण्याची शक्यता जास्त असते. हेच फायदे तुम्हाला अल्प काळात मिळणार नाहीत.
शेअर बाजारातील गुंतवणूक
जर तुम्ही विविध कंपन्यांमध्ये शेअर बाजारामधून गुंतवणूक करत असाल तर अल्प काळामध्ये जास्त फरक पडणार नाही. कधी तुम्हाला तोटा होईल किंवा फायदा होईल. मात्र, तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करून दीर्घ काळासाठी ठेवली तर त्या शेअर्सची किंमत वाढण्याची शक्यता जास्त असते. काही परिस्थितीमध्ये एखादी कंपनी चांगला परतावा देणार नाही. मात्र, एकंदर विचार करता चांगला परतावा मिळण्याची शक्यता जास्त असते. दीर्घ काळ गुंतवणुकीतून संपत्ती निर्माण होते तर अल्प काळ गुंतवणुकीतून तुम्हाला फक्त काही पैसे परतावाच्या स्वरुपात मिळतील मात्र, तुमची संपत्ती निर्माण होणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करताना सर्वात आधी तुमचे ध्येय काय आहे हे ठरवावे. त्यानुसारच प्रत्येक योजनेत पैसे गुंतवावे. मुलांचे शिक्षण, निवृत्तीनंतरचे नियोजन हे दीर्घ काळ गुंतवणुकीमध्ये मोडतात.