शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट तर प्रत्येकालाच करायची असते. पण सुरुवातीलाच मोठी इन्व्हेस्टमेंट करण्यास अनेक जण घाबरतात. मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येक नव्या इन्व्हेस्टरने सुरुवातीलाच जर मोठी इन्व्हेस्टमेंट केली आणि त्यात त्याचे मोठे नुकसान झाले तर ते पुन्हा शेअर मार्केटकडे बघणारच नाहीत. शेअर मार्केटमध्ये नवीन गुंतवणूकदारांचे आर्थिक नुकसान होऊ म्हणून बरेच जण त्यांना पेनी स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करण्याचा सल्ला देतात. मार्केटमध्ये भरपूर पेनी स्टॉक्स तर आहेत; पण त्यात जास्तीची रिस्क देखील आहे. त्यामुळे कमी किमतीतील योग्य स्टॉक निवडणे कठीन होऊ शकते. तुमचे हेच कठीण काम सोपे करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. चला तर जाणून घेऊयात 100 रुपयांत कोणते शेअर्स मिळू शकतात.
Table of contents [Show]
100 रुपयांच्या शेअर्सचा फायदा काय?
100 रुपयांत शेअर्स घेण्यापूर्वी त्याचे फायदे काय आहेत; हे जाणून घेऊ.
कोणीही गुंतवणूक करू शकतो
चांगल्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी भरपूर पैशांची गरज नसून केवळ लॉन्ग टर्म दृष्टिकोन आणि संयमाची गरज असते. व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंटमध्ये कायम संयम ठेवणे महत्त्वाचे असते. त्यामुळे अशा शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करताना लॉन्ग टर्म दृष्टिकोन व संयम बाळगणारा प्रत्येक नवा जुना इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करू शकतो.
कंपाऊंडिंगचा फायदा
कमी किमतीच्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट केल्याने कंपाऊंडिंगचा फायदा उचलणे शक्य होते. जर तुम्ही 100 रुपयांच्या आतील स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली व त्यातून मिळणारे रिटर्न्स, डिविडेंडदेखील पुन्हा त्याच स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केल्यास तुम्हाला मिळणाऱ्या फायद्यात वाढ होण्याची शक्यता आहे. कंपाऊंडिंगच्या सूत्रामुळे तुमची छोटीशी गुंतवणूक मोठा फायदा मिळवून देऊ शकते.
शेअर बाजारातील नफा वाढवा
स्ट्रॅटेजिक व्हॅल्यू इन्वेस्टींग ही शेअर मार्केटमधील मोठा फायदा मिळवण्याची, चाचणी केलेली आणि सिद्ध पद्धत मानली जाते. एक गुंतवणूकदार बाजारातील काही स्टॉक्स निवडू शकतो जे 100 रुपयांच्या खाली उपलब्ध आहेत किंवा जे स्टॉक त्यांच्या मूळ मूल्यापेक्षा भरपूर कमी किमतींमध्ये आहेत व त्यांच्या क्षमतेला पारखून त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. या इन्व्हेस्टमेंटमध्ये लॉन्ग टर्म बाजी खेळल्याने मोठा फायदा होण्याची शक्यता असते.