ATM card insurance: बँक अकाउंट सुरु झाल्यानंतर बँकेमधून मिळणाऱ्या एटीएम कार्डमुळे ऑनलाइन बँकिंगकडे लोकांचा कल अधिकच वाढला आहे. बँकेचा ग्राहक आपल्या सोईनुसार त्या एटीएम कार्डचा वापर करतात. बँकेच्या एटीएम कार्डमधून पैसे काढण्यासोबतच अनेक सुविधाही उपलब्ध आहेत. जसे की, मोफत विमा. कोविडनंतर लोकांचे बँक एटीएम कार्ड आणि ऑनलाइन पेमेंटवर अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढले आहे. आता कोणतीही वस्तू खरेदी करायची म्हटलं तर ऑनलाइन पेमेंट केले जाते. एवढेच नाही तर बँकेच्या एटीएम कार्डवर मोफत विम्याची सुविधाही उपलब्ध आहे. जाणून घ्या याबाबत डिटेल्स.
Table of contents [Show]
बँकेच्या एटीएम कार्डवर मोफत विम्याची रक्कम किती मिळते?
तुम्ही कोणत्याही बँकेचे एटीएम कार्ड 45 दिवसांपेक्षा जास्त काळ वापरल्यास तुम्ही मोफत विमा सुविधेसाठी पात्र ठरता. यामध्ये अपघात विमा आणि जीवन विमा या दोन्हींचा समावेश आहे. कार्डच्या कॅटेगरीनुसार रक्कम निश्चित करण्यात आली आहे. क्लासिक कार्डधारक 1 लाख, प्लॅटिनम 2 लाख, मास्टर 05 लाख, व्हिसा 1.5 ते 2 लाख आणि सामान्य मास्टरकार्ड 50,000 पर्यंत दावा करू शकतात.
प्रधानमंत्री जन-धन योजनेअंतर्गत मोफत विमा..
प्रधानमंत्री जन धन योजना खातेधारकांसाठी बँकेच्या एटीएम कार्डवर विशेष मोफत विमा पॉलिसी आहे. या अंतर्गत, तुम्ही सुमारे 1 ते 2 लाखांच्या मोफत विमा संरक्षणाचा दावा करू शकता. एवढेच नाही तर अपघात झाल्यास 5 लाख रुपये आणि कोणत्याही कारणाने अपंग झाल्यास 50 हजार रुपये घेता येतील. याशिवाय दोन्ही पाय किंवा हात पूर्णपणे इजा झाल्यास 1 लाख रुपयांपर्यंत आणि मृत्यू झाल्यास 1-5 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण उपलब्ध आहे.
एटीएम कार्डवर फ्री इन्शुरन्स क्लेम प्रोसेस काय आहे?
बँकेच्या एटीएम कार्डवर मोफत विम्याचा दावा करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. यासाठी, सर्व प्रथम खातेधारक नॉमिनीची माहिती मिळवा. तुम्ही रुग्णालयातील उपचार खर्च, प्रमाणपत्र, पोलिस एफआयआरची प्रत यासह विम्याचा दावा करू शकता. याशिवाय खातेदाराचा मृत्यू झाल्यास, अशा स्थितीत नॉमिनी मृत्यू प्रमाणपत्र सादर करू शकतो.
माहिती अभावी अनेक ग्राहक विम्यापासून वंचित
एटीएम कार्डसह उपलब्ध असलेल्या सेवांपैकी सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे मोफत विमा. बँकेने ग्राहकाला एटीएम कार्ड देताच 45 दिवसांनी ग्राहकाला अपघाती विमा किंवा जीवन विमा मिळतो. याबाबत अनेकांना माहिती नसते. त्यामुळे कार्डधारक या सुविधेपासून वंचित राहतात. याशिवाय बँका देखील ग्राहकांना एटीएमद्वारे मिळणाऱ्या विम्याची माहिती देत नाहीत.
(News Source: www.indiatv.in )