अनेक जणांची एकापेक्षा जास्त खाती असतात. व्यवहार त्वरीत होणं, हाताळणं त्यामुळे सुलभ जातं. मात्र एकापेक्षा जास्त अकाउंट असतील तर त्याकडे दुर्लक्ष अधिक होण्याची शक्यता असते. बँक खातं उघडल्यानंतर ते खातं सक्रिय (Active) ठेवणं गरजेचं असतं. अनेक दिवस त्याकडे दुर्लक्ष झाल्यास म्हणजेच त्याद्वारे कोणतेही व्यवहार न झाल्यास एक दिवस अकाउंट बंद होईल आणि तुम्हाला त्याची माहिती घेण्याचीही गरज भासणार नाही.
Table of contents [Show]
खात्यांचे प्रकार
नियमांनुसार, चालू, वेतन आणि बचत असे बँक खात्यांचे प्रकार आहेत. खातं कोणतंही असो, ते महिन्यातून काही दिवस नियमितपणे उघडणं किंवा त्याद्वारे व्यवहार होणं गरजेचं आहे. प्रत्येक बँक खात्यासाठी वेगवेगळे नियम आहेत. याशिवाय नोकरी बदलल्यावर बदलीदरम्यान बँक खातीदेखील बदलतात. हा बदल सोयीनुसार केला जातो. त्यामुळे ते वेगळं खातं उघडलं जातं किंवा कंपनी त्यांच्यासाठी नवीन खातं उघडते.
पुन्हा सुरू करण्यासाठी केवायसी आवश्यक
नवीन बँक जुन्या खात्याकडे दुर्लक्ष करत असते. बराच काळ व्यवहार झाला नसेल तर असं बँक खातं निष्क्रिय होतं. खंर तर अशी बँक खाती बंदच असतात. म्हणजे पूर्णपणे बंद नसून निष्क्रिय असतात. अशावेळी बँका त्यावर कारवाई म्हणून ते बंद करू शकतात. काही आवश्यक कागदपत्रे दिल्यानंतर बँक लगेच तुमचं खातं उघडते. कंपन्या बदलल्या, की अनेकदा बँकांची खाती बदलतात. त्यावेळी अचानक जुनं खातं आठवतं. तुम्ही तुमचं नाव, जन्मतारीख आणि मोबाइल असे डिटेल्स दिल्यास लगेच तुमचं जुनं निष्क्रिय खातं दिसतं.
खात्यातून व्यवहार करावा लागेल
खाते उघडल्यानंतर दोन वर्षांच्या आत तुम्ही बँक खाते कधीही वापरले नसेल तर ते बंद होण्यास किती वेळ लागेल? खात्यात किमान ठेव किंवा पैसे काढणं गरजेचं असतं. जर तुम्ही दोन वर्ष खात्याशी कोणताही व्यवहार केला नाही, तर खातं बंद केलं जातं. म्हणजेच त्यानंतर त्यामाध्यमातून व्यवहार करता येत नाहीत. ते सुरू करायचं असेल तर केवायसी कागदपत्रे पुन्हा बँकेला द्यावी लागतात. जर तुम्हाला हे खातं सुरू ठेवायचं असेल तर त्यातून व्यवहार करावा लागेल. समजा खातं बंद करायचं असेल तर बँकेत रीतसर अर्ज करावा.
अकाउंट ट्रान्सफर करण्याचा पर्याय
तुम्ही संबंधित बँकेच्या शाखेपासून जर लांब राहत असाल तर आधीच्यात शाखेला भेट देऊ शकता. नवीन ठिकाणी खातं ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज करू शकता. यासोबतच बँका वेळोवेळी केवायसी अपडेट करण्यासाठी अधिकृत ईमेल, मेसेजदेखईल पाठवत असतात. त्या आधारावर तुम्ही कोणत्याही लिंकवर न जाता तुमच्या ऑनलाइन बँक खात्यात जाऊन केवायसी अपडेट करू शकता.