Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Divgi Torqtranfer IPO : शेअर बाजारात 1 मार्च रोजी होईल या IPO'ची एंट्री, टाटा महिंद्रा यांची कंपनीत मोठी गुंतवणूक

Divgitorqtranfern systems IPO

Image Source : www.bqprime.com

इनिशीयल पब्लिक ऑफर म्हणजेच आयपीओ'त (IPO) गुंतवणुक करण्यासाठी विचार करत असाल एक आनंदाची बातमी आहे. ऑटो कंपोनंट निर्माती कंपनी दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टिम्सचा (Divgi Torqtranfer Systeams) आयपीओ 1 मार्च रोजी लाँच होणार आहे. देशात टाटा व महिंद्रा यांसारख्या दिग्गज कार कंपन्या यात गुंतवणुकदार आहेत. शेअर मार्केटमधील अनेक गुंतवणुकदारांची या आयपीओकडे नजर असणार आहे. या बहुचर्चित आयपीओ बद्दल जाणून घेऊया

ऑटो पार्ट्स बनवणाऱ्या पुण्यातील दिवगी टॉर्कट्रान्सफरचा IPO (IPO) बुधवारी उघडत आहे. यामुळे इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांची चांदी होणार आहे. याद्वारे त्यांचा ट्रस्ट कंपनीचे 14.4 लाख शेअर्स विकणार आहे.  412 कोटी रुपयांच्या IPO साठी किंमत 560-590 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली आहे. IPO च्या ड्राफ्ट हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार, नीलेकणी यांनी प्रति शेअर रु. 125.28 विकत घेतले होते. म्हणजेच एकूण 18 कोटी रुपयांना त्यांनी ही खरेदी केली होती. आता समजा IPO गुंतवणूकदारांना 590 रुपयांच्या वरच्या प्राइस बँडवर शेअर्सचे वाटप केले, तर नीलेकणी यांच्या ट्रस्टला 66.98 कोटी रुपयांचा नफा होईल. म्हणजेच त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर 370 टक्के परतावा मिळेल.

ग्रे मार्केटमध्ये केले उत्कृष्ट प्रदर्शन

 शेअर मार्केट तज्ज्ञांच्या मते, दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टिमचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये लोकप्रिय ठरल्यामुळे तेजीची चिन्हे दिसत आहेत. हे शेअर्स  ग्रे मार्केटमध्ये 60 रुपयांच्या प्रीमियमवरउपलब्ध झाले होते. म्हणजेच, जर इश्यू किमतीच्या विरूद्ध पाहिले तरते Rs.650 वर सूचीबद्ध केले जाऊ शकते.  (DivgiTorqTransfer Systems) च्या IPO मध्ये गुंतवणूकदारकिमान 25 इक्विटी शेअर्ससाठी बोली लावू शकतो. हा शेअर 14मार्च रोजी एक्सचेंजमध्ये लिस्ट केला जाऊ शकतो.

कंपनीत यांची प्रमुख हिस्सेदारी 

दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टीममध्ये ओमान इंडियाची 21.71टक्के हिस्सेदारी आहे, तर एनआरजेएनची 8.71 टक्के हिस्सेदारी आहे. भरतदिवगी, संजय दिग्गी आणि आशिष दिवगी यांचे अनुक्रमे 0.72टक्के, 0.59 टक्के आणि 0.76 टक्के आहेत. याशिवाय अरुण इदगुंजी आणि किशोर कलबाग यांची 0.16 टक्के हिस्सेदारी आहे.

टाटा व महिंद्रा या दिग्गजांचा  कंपनीत गुंतवणुकदार म्हणून समावेश

या ऑटो पार्ट कंपनीच्या ग्राहकांमध्ये टाटा ग्रुपच्या टाटा मोटर्स,महिंद्रा अँड महिंद्रा आणि टोयोटा किर्लोस्कर यांचा समावेश आहे. कंपनी मॅन्युअल ट्रान्समिशन, डीसीटी, ट्रान्सफर केसेस, टॉर्ककपलर्स आणि ऑटो-लॉकिंग हब (एएलएच) इ. ऑटो पार्ट्सची निर्मिती करून कंपनी प्रामुख्याने प्रवासी आणि लहान व्यावसायिक वाहन उद्योगाची अवश्यकतेची पूर्तता करते. कंपनीचे पुण्यातील भोसरी, कर्नाटकातील शिवरे आणि सिरसी येथे उत्पादन प्रकल्प आहेत.