Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FTA with UAE: सौदी अरेबियासोबत मुक्त व्यापार करारासाठी चर्चा सुरु, भारतीय रुपयाचा होणार विस्तार

FTA

रिझर्व बँक ऑफ इंडियाने आणि वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जगातील वेगवगेळ्या 22 देशांसोबत रुपयामध्ये आर्थिक व्यवहाराला परवानगी दिली आहे. यासाठी देशांतर्गत बँकांमध्ये विशेष रुपी व्होस्ट्रो खाती सुरू करण्यात आली आहेत. यामुळे व्यापार सुलभ होईल आणि भारतीय रुपयाची पत वाढेल असा आरबीआयला विश्वास आहे.

भारत आणि सौदी अरेबिया हे दोन देश वेगवान अर्थव्यवस्था असलेले देश आहेत आणि या दोन्ही देशांनी एकत्रित येऊन आर्थिक नीतीवर काम केल्यास दोन्ही देशांना त्याचा फायदा अहौ शकतो असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स, राजपुत्र आणि प्रधानमंत्री मोहम्मद बिन सलमान अल साउद (Mohammed bin Salman Al Saud) यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान म्हटले होते.

भारताच्या या प्रस्तावाला सौदी अरेबियाने देखील सकारात्मकता दाखवली असून दोन्ही देशांमध्ये येत्या काही काळात चांगले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध निर्माण होतील असा विश्वास सौदी अरेबिया सरकारने व्यक्त केला आहे.

सोमवारी दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी भारत-आखाती सहकार्य परिषद (The Gulf Cooperation Council) मुक्त व्यापार करार (Free Trade Agreement ) यासाठी आवश्यक त्या वाटाघाटी करण्याचे मान्य केले आहे.

सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव औसफ सईद (Ausaf Sayeed) यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. फिनटेक, अंतराळ क्षेत्र, सांस्कृतिक देवाणघेवाण, मुक्त व्यापार आदी क्षेत्रात एकमेकांना सहकार्य करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच रुपयामध्ये सौदी अरेबियाशी व्यवहार केला जाऊ शकतो का हे देखील तपासून घेतले जाणार आहे. तसेच मुक्त व्यापार करारासाठी सौदी अरेबियासोबत बोलणी सुरु असून याआधी युके आणि कॅनडासोबत आधीच बोलणी सुरु झाली आहे. दिल्लीतल्या जी-20 बैठकीनंतर मुक्त व्यापार करारासाठीची बोलणी अधिक सकारात्मक पद्धतीने पुढे जाणार आहे असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

22 देशांशी रुपयांत व्यवहार 

रिझर्व बँक ऑफ इंडियाने आणि वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जगातील वेगवगेळ्या 22 देशांसोबत रुपयामध्ये आर्थिक व्यवहाराला परवानगी दिली आहे. यासाठी देशांतर्गत बँकांमध्ये विशेष रुपी व्होस्ट्रो खाती सुरू करण्यात आली आहेत. यामुळे व्यापार सुलभ होईल आणि भारतीय रुपयाची पत वाढेल असा आरबीआयला विश्वास आहे.

मुक्त व्यापार कराराचा फायदा 

भारताचा सौदी अरेबिया, युके आणि कॅनडासोबत मुक्त व्यापार करार झाल्यास या देशांसोबतचा व्यापार सुलभ होईल आणि किचकट अटी दूर केल्या जातील. त्यामुळे मध्यम आणि लघु व्यापाऱ्यांना देखील याचा फायदा होतील. यासोबतच निर्यात आणि आयातीवर शुल्क देखील कमी होऊ शकते आणि व्यापाऱ्याच्या संधी विस्तारल्या जातील.