देशात ऑनलाईन गेमिंग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या एक डझनहून जास्त कंपन्यांना डायरेक्टोरेट जनरल ऑफ जीएसटी इंटॅलिजन्सने प्री शोकॉज नोटीस बजावली आहे. ही रक्कम थोडीथोडकी नसून तब्बल 55 हजार कोटी रुपये इतकी आहे. यात फॅन्टसी स्पोर्टस प्लॅटफॉर्म ड्रीम 11 ला जवळपास 25 हजार कोटी रुपये जीएसटी नोटीस बजावली आहे.
एका आर्थिक पोर्टलच्या माहितीनुसार आगामी काही आठवड्यांमध्ये आणखीनही काही गेमिंग कंपन्यांना अशी नोटीस बजावण्यात येणार आहे. यानं जीएसटी नोटीशीचा हा आकडा वाढून एक लाख कोटी इतका होऊ शकतो असं सांगण्यात येत आहे
का दिली गेली प्री शोकॉज नोटीस?
आँनलाईन गेमिंग कंपन्यांवरील जीएसटी 28 टक्के झाला आहे. हा नवा नियम जूलै 2023 मध्ये लागू झाला आहे.त्याअंतर्गत कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
यावर ऑनलाईन गेमिंग कंपन्यांचं काय म्हणणं आहे?
ज्या कंपन्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे त्यात प्ले गेम्स 24x7 आणि त्यांच्या सहयोगी कंपन्या आणि हेड डिजिटल वर्क्स यांचाही समावेश आहे. ड्रीम 11 आणि हेड डिजिटल वर्क्स यांनी याबाबत कोणताही प्रतिक्रीया देण्यास नकार दिला आहे.मात्र ड्रीम 11 ने याविरोधात मुबई हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले असल्याचीही माहिती समोर येत आहे.
कोणत्या कंपन्यांना किती रकमेची मिळाली नोटीस?
कंपनीचं नाव रकमेचा आकडा
ड्रीम 11 25 हजार कोटी
प्ले गेम्स 24x7 20 हजार कोटी
रमी सर्कल,माय 11 सर्कल 20 हजार कोटी
हेड डिजिटल वर्क्स 5 हजार कोटी