Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Destination wedding : श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला ‘डेस्टिनेशन वेडिंग’चा आधार

Destination wedding

Image Source : www.dulhaniyaa.com

डेस्टिनेशन वेडिंगच्या (Destination Wedding) बाबतीत, बहुतेक परदेशी लोक श्रीलंकेला (Sri Lanka) परफेक्ट देश मानतात. मात्र सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अशातच पर्यटक पुन्हा श्रीलंकेकडे वळल्याने श्रीलंका सरकारमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

डेस्टिनेशन वेडिंगच्या (Destination Wedding) बाबतीत, बहुतेक परदेशी लोक श्रीलंकेला (Sri Lanka) परफेक्ट देश मानतात. मात्र सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. गेल्या वर्षी, कोविड महामारीनंतर, श्रीलंकेने पुन्हा एकदा वेडिंग टुरिझमला चालना देण्यास सुरुवात केली, परंतु आर्थिक संकटामुळे त्याचे योग्य पालन होऊ शकले नाही. किंबहुना, गेल्या वर्षी या देशातील आर्थिक संकट काही क्षणातच राजकीय संकटात रूपांतरित झाले होते, ज्यामुळे तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि त्यांच्या सरकारची हकालपट्टी झाली.

उद्योग अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, श्रीलंकेचे वेडिंग टूरिझम क्षेत्र 130,000 नोकऱ्यांसह दरवर्षी सुमारे 150 ते 200 दशलक्ष डॉलर कमावते. 2023 साठी, राज्य-संचालित श्रीलंका पर्यटन विकास प्राधिकरणाने 2.8 अब्ज डॉलर कमाईसह 1.55 दशलक्ष पर्यटकांना आकर्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जानेवारी 2023 मध्ये 1.02,545 पर्यटक श्रीलंकेत आले होते.

श्रीलंकासारख्या देशांमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणे स्वस्त

श्रीलंकेच्या या क्षेत्राचा लाभ भारताला मिळू शकतो. मात्र, यादरम्यान, काही श्रीलंकन वेडिंग डेस्टिनेशन प्लॅनर देखील भारत आणि काही युरोपियन देशांमध्ये संधी शोधत आहेत, जेणेकरून ते त्यांच्या देशात विवाह आयोजित करून परकीय चलन मिळवू शकतील. परदेशी लोक डेस्टिनेशन वेडिंगमध्ये बहुतांश पेमेंट यूएस डॉलर्स, युरो आणि पाउंड्समध्ये करतात. युरोपियन देशांमध्ये लग्न करण्याऐवजी भारत आणि श्रीलंकासारख्या देशांमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणे त्यांना स्वस्त पडते.

डेस्टिनेशन वेडिंगमुळे श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल का?

डेस्टिनेशन वेडिंग ग्लोबल मार्केट रिपोर्ट 2023 नुसार, ग्लोबल डेस्टिनेशन वेडिंग मार्केट या वर्षी 32.8% वाढून 28.31 अब्ज डॉलर होण्याची अपेक्षा आहे. सध्या आर्थिक संकटाचा सामना करत असलेले श्रीलंकेचे पर्यटन क्षेत्र आता हळूहळू सावरत आहे. यापूर्वी 2009 मध्ये गृहयुद्ध संपल्यानंतर श्रीलंकेतील वेडिंग टुरिझममध्ये मोठी वाढ झाली होती. परंतु 2012 मध्ये आर्थिक मंदीमुळे या क्षेत्राची घसरण सुरू झाली.

भारतातही संधी

दरम्यान, तज्ज्ञ भारताकडे वेडिंग टुरिझमचा संभाव्य पर्याय म्हणून पाहत आहेत. कारण कर वाढल्यामुळे श्रीलंकेत येऊन डेस्टिनेशन वेडिंग करणं कुणालाही महागात पडू शकतं. डेस्टिनेशन वेडिंगसाठी भारत आणि मिडल इस्ट हे उत्तम पर्याय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

भारतीय डेस्टिनेशन वेडिंगसाठी श्रीलंकेत

तज्ज्ञांच्या मते, आता अनेक भारतीय डेस्टिनेशन वेडिंगसाठीही श्रीलंकेत येत आहेत. त्यामुळे देशाच्या पर्यटन उद्योगात त्यांचे योगदान वाढत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जानेवारीमध्ये 24.5 टक्के अधिक पर्यटक श्रीलंकेत आले आहेत. या आकड्याने श्रीलंका सरकारमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पर्यटन उद्योग हा श्रीलंकेचा मोठा आधार आहे. 2019 मध्ये इस्टर बॉम्बस्फोटानंतर येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट होऊ लागली होती. कोरोना महामारीच्या काळात हा उद्योग ठप्प झाला होता. श्रीलंकेत निर्माण झालेल्या आर्थिक संकटासाठी ही सर्वात महत्त्वाची बाब मानली जात आहे.