तुम्ही जर निवृत्त सरकारी कर्मचारी असाल आणि तुम्हांला दरमहा पेन्शन मिळत असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आली आहे. तुमची पेन्शन तुम्हांला नियमित हवी असेल तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्यात तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर (Life Certificate) करणे आवश्यक आहे. पेन्शन फंड-वितरण करणार्या तुमच्या बँकेला तुमच्या जीविताच्या दाखल्यावरून ही पेन्शन सुरु ठेवावी अथवा नाही याचा अंदाज घेणे सोपे ठरते, त्यामुळे दरवर्षी जीविताचा/ हयातीचा दाखला बँकेत जमा करणे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे, 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी, ऑक्टोबरमध्ये त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतरच त्यांची पेन्शनची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. जीवन प्रमाणपत्र सादर करण्यात निवृत्त कर्मचारी अयशस्वी झाल्यास त्यांची पेन्शन रद्द केली जाईल असे सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारने डिजिटल लाइफ सर्टिफिकेट कॅम्पेन 2.0 (Digital Life Certificate Campaign 2.0) सुरू केले असून, सुमारे 70 लाख पेन्शनधारकांना लाभ देण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
ही मोहीम विशेषतः अशा व्यक्तींसाठी फायदेशीर ठरणार आहे जे आजारी आहेत किंवा वृद्ध आहेत आणि प्रत्यक्षरित्या बँकेला भेट देऊ शकत नाहीत. अशा पेन्शनधारक व्यक्तींच्या घरी जाऊन सरकारी आणि बँकेचे कर्मचारी त्यांची भेट घेणार असून त्यांना जीवन प्रमाणपत्र देणार आहे.
DOPPW issues Comprehensive Guidelines for Nationwide Digital Life Certificate Campaign 2.0 to be held in November, 2023 to benefit 70 Lakh Central Government Pensioners
— PIB India (@PIB_India) August 9, 2023
Face Authentication Technology will be utilized for submission of Digital Life Certificate by pensioners…
फेशियल ऑथेंटिकेशनने होणार काम सोपे!
दरवर्षी 70 लाखांहून अधिक व्यक्तींना सरकारद्वारे पेन्शन दिली जाते. आधुनिकतेचा वापर करत सरकारने फेशियल ऑथेंटिकेशन सुविधा सुरु केली आहे. पेन्शन घेणारे व्यक्ती घरात बसूनही हे काम करू शकतात. यासाठी नेमके काय करायला हवे हे जाणून घेऊया.
- फेशियल ऑथेंटिकेशनसाठी तुमच्याकडे स्मार्टफोन असायला हवा. तुमच्या स्मार्टफोनवर आधार फेस आरडी सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा.
- ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर, ऍप्लिकेशन उघडा आणि तिथे विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती भरा.
- तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि ईमेल देणे आवश्यक आहे.
- तुमच्या नोंदणीकृत ईमेल आणि मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल.
- OTP वेरीफाय केल्यानंतर, ऍप्लिकेशन सिस्टम तुमचा चेहरा स्कॅन करेल.
- प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला एसएमएस आणि इमेलद्वारे कळविण्यात येईल.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) नुसार, ही मोहीम येत्या 1 नोव्हेंबरपासून देशभरात सुरू होणार आहे आणि ही मोहीम पुढे 30 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. 50 लाख सेवानिवृत्तांना या मोहिमेत समाविष्ट करण्यासाठी 100 शहरांमध्ये डिजिटल लाइफ सर्टिफिकेट कॅम्पेन 2.0 ही मोहीम राबविण्यात येणार आहे.