Jowar: भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतातील 70 टक्के जनता शेती करतात. गहू, ज्वारी, बाजरी, तूर, कापूस, हरभरा यापैकी सर्वच पिकं येथे घेतली जातात. दहा वर्षाच्या आधी जवळपास 50 टक्के लोक ही ज्वारीची भाकरी दररोज जेवणात खात होते. पण आता विविध प्रकारचे पदार्थ आल्याने लोक फक्त चव बघतात, पोष्टीकता नाही त्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. आपल्याच देशात पिकणाऱ्या ज्वारी बाजरीला विदेशात मागणी आहे आणि इतर देशातील वेगवेगळे पदार्थ आपल्या देशात लोकप्रिय आहे. तर जाणून घेऊया, ज्वारी आणि बाजरीच्या वाढत्या मागणीबद्दल.
भारतातून परदेशात भरड धान्याची आयात (Import of coarse grain abroad from India)
भारतात सध्या तरुण वर्गाचा कल जंक फूड खाण्याकडे जास्त आहे. पिझ्झा, बर्गर, चायनीज यासारखे पदार्थ खूप जास्त पसंत केले जात आहे. आणि परदेशात ज्वारी बाजरीची मागणी वाढली आहे. कोरोंनाचे सर्वात मोठे संकट नुकतेच गेले असल्याने परदेशात सध्या आरोग्याची काळजी घेण्याकडे सर्वाधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. आर्थिक वर्ष 2021- 22 दरम्यान परदेशात भारतातून 100 कोटी रूपयांच्यावर धान्य आणि 500 कोटींच्या जवळपास बाजरीचे बियाणे आयात केल्याची माहिती मिळाली आहे. भरड धान्य उत्पादनामध्ये भारत हा पहिल्या क्रमांकावर आहे.
जागतिक तृणधान्य वर्ष 2023 (World Year of Cereals 2023)
कोरोंना महामारीमुळे संपूर्ण जग हादरले होते, गेल्या काही महिन्यात ते सावरतांना दिसत आहेत. कोरोंनासोबत लढण्यासाठी शरीरात शक्ती तर पाहिजेच, मग शक्ती हवी असेल तर त्यासाठी सर्वाधिक मदत होते ती भरड धान्याची. भरड धान्यामुळे शरीराला आवश्यक असलेले घटक मिळतात आणि नेहमी नेहमी डॉक्टरकडे जाण्याची गरज पडत नाही. म्हणून भरड धान्य पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे याकरिता 2023 हे वर्ष 'जागतिक तृणधान्य वर्ष' म्हणून साजरे करण्यात येत आहे. परदेशात मागणी असल्याने तृणधान्य साठा वाढवण्याकरीता सरकार कडून अनेक प्रयत्न केले जात आहे.