पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 12 फेब्रुवारी रोजी दिल्ली ते मुंबई मेगा एक्सप्रेसवे (Delhi To Mumbai Mega Expressway) पर्यंतच्या 1,386 कि.मी. लांबीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. एक्सप्रेसवेचा पहिला टप्पा दिल्ली आणि जयपूर दरम्यान आहे. जेव्हा हा मेगा-एक्स्प्रेसवे पूर्णपणे कार्यरत होईल, तेव्हा दिल्ली आणि मुंबई दरम्यान फक्त 12 तासाचे अंतर उरेल, जे अद्याप 24 तास आहे. 2024 पर्यंत संपूर्ण प्रकल्प पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. या मार्गावर टोल टॅक्स (Toll) किती द्यावा लागेल? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
किती टोल टॅक्स भरावा लागणार?
खलीलपूर हे दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेच्या सुरुवातीच्या पॉइंटपासून सुमारे 20 किमी अंतरावर आहे. येथे प्रवास करण्यासाठी लाईट व्हेइकलमधून प्रवास करण्यासाठी 90 रुपयांचा टोल टॅक्स भरावा लागणार आहे. मिंटच्या अहवालानुसार लाईट कमर्शिअल वाहनांसाठी हा दर 145 रुपये असेल. जर कोणी बरकापाराला गेला तर त्याला लाईट वाहनात प्रवास करताना 500 रुपयांचा टोल कर भरावा लागेल, तर लाईट कमर्शिअल वाहनांसाठी टोल टॅक्स 805 रुपये असेल. खलीलपूर आणि बरकापारा व्यतिरिक्त टोल गेट्स समासाबाद, शीतल, पिनान आणि डुंगरपूरमध्येही आढळतील. जर 7 एक्सेल वाहन एंट्री पॉईंटपासून बरकापाराकडे गेले तर त्यास 3,215 रुपये टोल टॅक्स द्यावे लागेल. सोहना येथून प्रवेश करणाऱ्या वाहनांना पश्चिम परिघीय खलीलपूर लूपवर हा टोल भरावा लागेल.
प्रवासाचा वेळ वाचणार
दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे हा भारतातील सर्वात लांब एक्सप्रेसवे आहे. यामुळे दिल्ली आणि मुंबई दरम्यानचे अंतर 1,424 किमी ने कमी होऊन 1,242 किमी होईल. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे. आतापर्यंत दोन शहरांमध्ये कारने प्रवास करण्यास 24 तास लागतात, जे या एक्सप्रेसवेच्या सुरु होण्याने फक्त 12 तास राहील. हा एक्सप्रेस वे दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या 6 राज्यांना जोडतो. मुख्य शहरांमध्ये कोटा, इंदूर, जयपूर, भोपाळ, वडोदरा आणि सूरत यासारख्या नावांचा समावेश आहे.
प्रति तास 120 किमी वेग
या एक्सप्रेसवेवर कायदेशीररित्या उच्च गती मर्यादा प्रति तास 120 किलोमीटर निश्चित करण्यात आली आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेमध्ये 40 इंटरचेंज आहे. जे जयपूर, किशनगड, अजमेर, कोटा, चित्तोडगड, उदयपूर, भोपाळ, उज्जैन, इंदूर, अहमदाबाद, वडोदरा आणि सूरत या शहरांना अधिक चांगले जोडतील. हरियाणामध्ये सोहना-दौसा स्ट्रॅट 160 किमी आहे आणि गुरुग्राम, पलवल आणि नूह या जिल्ह्यांमधून जाईल. यात गुरुग्रामची 11 गावे, पलवलची 7 आणि नूह जिल्ह्यातील 47 गावे असतील. संपूर्ण प्रकल्प अंदाजे 98,000 कोटी रुपयांच्या किंमतीवर बांधला जात आहे.