Do Delhi to Mathura-Vrindavan trip in Rs 1400: जर तुम्ही कधी सुट्टींच्या दिवसात दिल्ली ते मथुरा-वृंदावन ट्रिपचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी खास प्लॅन आहे, तो ही अगदी कमी बजेटमध्ये (Low Budget)!
Table of contents [Show]
दिल्ली ते मथुरा-वृंदावन कसे जायचे? (How to go from Delhi to Mathura-Vrindavan)
जर तुमच्याजवळ कार असेल, तर तुम्ही तुमच्या गाडीने दिल्ली ते मथुरा-वृंदावनचा प्रवास करू शकता. दिल्ली ते मथुरा हे अंतर फक्त 182 किमी आहे. तुम्ही या ठिकाणी फक्त तीन तासात पोहोचाल. या लांबच्या प्रवासात तुम्ही एखादा ड्रायव्हर हायर करू शकता. ही तुमची ट्रीप एखादया दिवसातदेखील होऊ शकते.
वाॅल्वो बस किंवा टॅक्सी (Volvo Bus or Taxi)
तुम्ही दिल्लीवरून वाल्वो बस किंवा टॅक्सीची निवड करू शकता. वाॅल्वो बसने जाणार असाल, तर तिकिटाचा खर्च फक्त 699 रूपये येईल. म्हणजे फक्त 14,000 रूपयांमध्ये तुम्ही दिल्ली ते मथुरा वृंदावन येऊन-जाऊन करू शकता. वाॅल्वो तिकिटची बुकिंग तुम्ही आॅनलाइनदेखील करू शकता. जर तुम्ही खासगी गाडीची निवड केली तर तुम्हाला 5,500 रूपये इतका खर्च येईल व इनोवा गाडी बुक केली तर 8,500 रूपये इतका खर्च येईल.
मथुरा-वृंदावन कुठे थांबायचे? (Where to stay in Mathura-Vrindavan)
मथुरा वृंदावन या ठिकाणी थांबण्यासाठी आश्रम व हाॅटेल हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. आश्रममध्ये राहण्यासाठी 300 ते 850 रूपये भाडे आकारतात. या ठिकाणी बुकींग दहा दिवसांपूर्वीच करावी लागते. तर हाॅटेलमध्ये राहण्यासाठी तुम्हाला 800 रूपये ते 3000 रूपये इतका खर्च येईल. येथे थांबण्यासाठी बुकिंग तुम्ही आॅनलाईनदेखील करू शकता. म्हणजेच मथुरा-वृंदावन ट्रिप करण्याचा एका व्यक्तीचा खर्च साधारण 1500 रूपये इतका येईल.
मथुरा-वृंदावन पॅकेज (Mathura-Vrindavan Package)
मथुरा-वृंदावनसाठी कित्येक ट्रॅव्हल कंपन्या स्वस्तात प्लॅन करतात. जर तुम्ही कुटुंबासोबत जाणार असाल, तर एक कारदेखील बुक करू शकता. ट्रॅव्हल एजंट तुम्हाला टॅक्सी व वाॅल्वो असे दोन प्रकारचे पर्याय देतात. किंवा तुम्ही स्वत:देखील सांगितल्याप्रमाणे मथुरा-वृंदावन ट्रीपचा छान प्लॅन करू शकता.