Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

DCX System Listing : तेजीच्या लाटेत DCX System चा गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा, शेअर मार्केटमध्ये जोरदार एन्ट्री

DCX System Ltd, DCX System Ltd IPO Listing Today, IPO, BSE, NSE

Image Source : www.bseindia.com

DCX System Listing : शेअर मार्केटमध्ये आज तेजीची लाट धडकली आहे.गुंतणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदी सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी रेकॉर्ड पातळीवर गेला. या लाटेत DCX System या कंपनीने शेअर मार्केटमध्ये जोरदार एन्ट्री घेतली.

शेअर मार्केटमध्ये आज शुक्रवारी 11 नोव्हेंबर रोजी जबरदस्त तेजी दिसून आली. सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1100 अंकांनी वधारला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 18353 या नव्या वर्षभरातील उच्चांकी पातळीवर गेला. या तेजीच्या लाटेत आज DCX System या कंपनीचे जोरदार लिस्टिंग झाले. DCX System ने पहिल्याच दिवशी IPO मधील भाग्यवान गुंतवणूकदारांना 39% परतावा दिला.

इलेक्ट्रॉनिक सबसिस्टम तयार करणाऱ्या DCX System ची आज बीएसई आणि एनएसई अशा दोन्ही मार्केटमध्ये लिस्टिंग झाली. कंपनीने IPO मधून 500 कोटींचे भांडवल उभारले.  DCX System च्या आयपीओ योजनेला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला होता. DCX System ने IPO साठी प्रती शेअर 197-207 असा दर निश्चित केला होता. IPO च्या शेवटच्या दिवशी कंपनीचा इश्यू 69.79 पटीने ओव्हर सबस्क्राईब झाला होता.त्यात नॉन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरचा हिस्सा 43.79 पट आणि क्वालिफाई़ड इन्स्टिट्युशनल बायर्सचा हिस्सा 84.32 पटीने ओव्हर सबस्क्राईब झाला होता. त्यामुळे शेअर बाजारात किती प्रिमियवर लिस्टिंग होते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले होते.    

आज सकाळी DCX System Ltd चे सीएमडी डॉ. एच. एस राघवेंद्र यांच्या उपस्थितीत मुंबई शेअर बाजारात घंटानाद करुन शेअरचे लिस्टिंग झाले.बीएसईवर  286.25 रुपयांवर खुला झाला. गुंतवणूकदारांना 38.29% रिटर्न मिळाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या मंचावर DCX System चा शेअर 287 रुपयांवर लिस्ट झाला. IPO तील इश्यू प्राईसच्या तुलनेत तो 39% प्रिमियमसह लिस्ट झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण होते. आजच्या इंट्रा-डेमध्ये DCX System ने 319.75 रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला होता. 

दुपारी 3 वाजता DCX System Ltd चा शेअर 306.40 रुपयांवर ट्रेड करत होता. त्यात 7.02% वाढ झाली. IPO च्या इश्यू प्राईसची तुलना करता DCX System Ltd चा शेअर 48.02% वाढला आहे. आयपीओ योजनेत DCX System चे शेअर प्राप्त झालेल्या भाग्यवान गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी जबरदस्त रिटर्न मिळाला.