Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cyient DLM IPO: सायंट डिएलएम कंपनीचा आयपीओ लवकरच बाजारात येणार!

Cyient DLM IPO

Cyient DLM: सध्या शेअर बाजारात आयटी क्षेत्रात वाताहत सुरू आहे, शेअर्स कोसळत आहेत. असे असले तरी हैद्राबादमधील प्रसिद्ध सायंट कंपनीची उपकंपनी सायंट डिएलएम या कंपनीने बाजारात आयपीओ आणण्यासाठी अर्ज दाखल केला आहे, संपूर्ण तपशील पुढे वाचा.

Cyient DLM IPO: हैदराबादस्थित सॉफ्टवेअर कंपनी सायंट डिएलएम (Cyient DLM) ही सायंट (Cyient) कंपनीची उपकंपनी आहे. सायंट डिएलएम या कंपनीचा आयपीओ (IPO Initial Public Offering) आणण्याच्या तयारीत आहे. कंपनी ताज्या इश्यूद्वारे म्हणजेच नवीन शेअर्स जारी करून बाजारातून 740 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे, ही माहिती सायंट कंपनीने नुकतीच जाहिर केली आहे. सायंट डिएलएम कंपनीने आयपीओ आणण्यासाठी स्टॉक मार्केट रेग्युलेटर सेबीकडे (SEBI: Securities and Exchange Board of India) एक मसुदापत्र दाखल केले आहे.

एनएससी आणि बीएसईवर होणार लिस्टींग (Listing will be done on NSC and BSE)

कंपनीने माहिती दिली की सायंट डिएलएम कंपनीने बीएसई (BSE) आणि एनएसई सूचीकरणासाठी सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केला आहे. सायंट डिएलएमच्या (Cyient DLM) आयपीओमध्ये (IPO) 740 कोटी रुपयांचा नवीन इश्यू असेल. कंपनीने माहिती दिली आहे की, बुक रनिंग लीड मॅनेजरशी सल्लामसलत केल्यानंतर, प्री-आयपीओ प्लेसमेंटपूर्वी, कंपनी आयपीओचा आकार आणखी 148 कोटी रुपयांनी वाढवू शकते. या आयपीओमध्ये पात्र कर्मचारी आणि सायंटच्या पात्र भागधारकांसाठी शेअर्स राखीव असतील. सायंट डिएलएम (Cyient DLM) इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात आहे.

सायंटचे मार्केट कॅप किती कोटींचे आहे? (What is the market cap of Cyient?)

ही जागतिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान कंपनी आहे. सायएंटचा शेअर मंगळवारी स्टॉक एक्सचेंजमध्ये 1.32 टक्क्यांच्या वाढीसह 841.25 रुपयांवर बंद झाला. गेल्या वर्षभरात कंपनीचा शेअर जवळपास 20 टक्क्यांनी घसरला आहे. 2022 मध्ये आयटी समभागांनी मोठी धडक मारली आहे, ज्यामुळे कंपनीला मोठा फटका सहन करावा लागला आहे. गेल्या दोन वर्षांत या समभागाने 57 टक्के आणि पाच वर्षांत 44 टक्के परतावा दिला आहे. सायंट कंपनीचे मार्केट कॅप 9 हजार 297 कोटी रुपये आहे. सायएंटमध्ये परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा 32.62 टक्के आहे तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा 23.73 टक्के हिस्सा आहे.