क्रिप्टोकरन्सी बाजारात हिवाळा (Crypto Winter) वाढत चालला आहे. तसेच सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून निष्क्रिय बिटकॉइन्सची संख्या 15 दशलक्षाहून अधिक झाली आहे. बाजारात क्रिप्टो होल्डर्सचे (Crypto Holdars) प्रमाण वाढले आहे. किमतीची पर्वा न करता अनेक ग्राहक क्रिप्टोकरन्सी खरेदी करतात व आपल्या क्रिप्टो कलेक्शनमध्ये ठेवतात. या धारकांना होल्डर्स असे म्हणतात.
क्रिप्टो विंटर (Crypto winter) म्हणजे काय?
क्रिप्टो विंटर क्रिप्टोकरन्सी मार्केटमधील त्या वेळेला म्हटले जाते; ज्या वेळेत मार्केटचा ओव्हरऑल परफॉर्मन्स खराब असतो. क्रिप्टो विंटर हे शेअर मार्केटमधील बेअर्स मार्केट प्रमाणेच असते. क्रिप्टो विंटरमध्ये मार्केट खाली कोसळते व अॅसेट्सचे मूल्य देखील खूप कमी होते.
बिटकॉइन (Bitcoin) गेल्या दशकभरापासून स्थिर होता. मात्र 2018 ते 2021 या कालावधीत बिटकॉइनमधे मुबलक प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. एका क्रिप्टो वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार बिटकॉइनच्या किमतीत सतत घट झाल्यामुळे ही स्थिरता आली आहे. या स्थिरतेमुळे क्रिप्टो गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
काही महिन्यांपासून बिटकॉइनची किंमत $ 17,000 वर स्थिर
क्रिप्टो बाजार संपूर्णतः मंदावला आहे. बिटकॉइनच्या किमतीचा प्रत्यक्ष परिणाम सोसणारे कॉइन्स अधिकाधिक नीचांक गाठत होते. मात्र गेल्या काही काळापासून बिटकॉइनच्या किमतीत स्थिरता पाहायला मिळत आहे. क्रिप्टो बाजारात झालेली ही घट गुंतवणूकदारांनी आधी अनुभवली आहे यामुळे त्यांनी या स्थितीत भयभीत न होता एका अपेक्षित परताव्यासाठी बिटकॉइन्स होल्ड करुन ठेवले आहेत.
बिटकॉइनच्या या स्थिरतेमुळे क्रिप्टो बाजारात मंदीचे सावट आले आहे. बिटकॉइन किंवा कुठल्याही क्रिप्टोकरन्सीत (क्रिप्टोकरन्सी) ट्रेड करणे धोक्याचे मानले जात आहे. लवकरच क्रिप्टो बाजार पुन्हा पूर्ववत होईल अशी गुंतवणूकदारांना आशा लागली आहे.