क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये (Cryptocurrency Market) काही काळ सुरू असलेला चढ-उतार मंगळवारीही कायम राहिला. मंगळवारी बहुतेक प्रमुख क्रिप्टो टोकन्समध्ये घट नोंदवली गेली. जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनच्या किमतीत गेल्या 24 तासांत सुमारे 0.05 टक्क्यांनी घसरण झाली असून त्याची किंमत जवळपास 23,397 डॉलरवर आली आहे. तर पॉलिगॉन, सोलाना 2% पेक्षा जास्त घसरले आहेत.
या क्रिप्टो टोकनमध्ये दिसली घसरण
क्रिप्टो टोकन इथरियमची किंमत 0.29 टक्क्यांनी कमी होऊन 1,628.37 डॉलर झाली आहे. गेल्या सात दिवसांत हे क्रिप्टो टोकन 4.15 टक्क्यांनी घसरले आहे. गेल्या 24 तासात बीएनबीमध्ये 0.54 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या सात दिवसांत तो 3.66 टक्क्यांनी घसरला आहे. या क्रिप्टो टोकनची किंमत 304.11 डॉलरच्या पातळीवर आली आहे. तर पॉलिगॉन 2.20 टक्क्यांनी घसरला आणि त्याची किंमत 1.23 डॉलरवर आली आहे. गेल्या 24 तासांत सोलानाच्या भावात 2.24 टक्क्यांनी घसरण झाली आहे. या क्रिप्टो टोकनची किंमत 22.33 डॉलरपर्यंत खाली आली आहे. गेल्या एका आठवड्यात ही क्रिप्टोकरन्सी सुमारे 14 टक्क्यांनी घसरली आहे.
या क्रिप्टो टोकन्समध्ये तेजी आली
गेल्या 23 तासात यूएसडी कॉईनमध्ये 0.02 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे एक्सआरपी (XRP)ने 0.52 टक्के, कार्डानोमध्ये (Cardano) 0.43 टक्क्यांची वाढ पाहण्यात आली. डॉजेकॉईन (Dogecoin) मध्ये देखील 0.84 टक्के वाढ दिसून आली. शिबू इनू 1.71 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होते. गेल्या एका आठवड्यात, हे क्रिप्टो टोकन सुमारे 7.67 टक्क्यांनी घसरले आहे. गेल्या 24 तासात लाईटकॉईन (Litecoin) 0.64 टक्क्यांनी कमी झाले आहे. एव्हलँच मध्ये 2.52 टक्के घसरण नोंदवण्यात आली आहे.
मेटाव्हर्स टोकन
बहुतेक टॉप मेटाव्हर्स टोकन (Metaverse Token) रेड झोनमध्ये राहिले. सँडबॉक्सच्या किमतीत 0.57 टक्के घट नोंदवली गेली, जी Axie Infinity मध्ये 0.27 टक्क्यांनी कमी झाली. याउलट, डेसेंट्रालँड 0.27 टक्क्यांनी वाढला.