जगातील सर्वात महागडी आणि लोकप्रिय क्रिप्टो करन्सी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिटकॉइनने आज 17000 डॉलरचा टप्पा पुन्हा ओलांडला. आज शुक्रवारी 9 डिसेंबर 2022 रोजी क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये तेजी दिसून आली. बिटकॉइन 2% ने वधारला आणि तो 17230 डॉलर इतका झाला. मागील 24 तासांत जागतिक क्रिप्टो मार्केटची उलाढाल 896 बिलियन डॉलर इतकी होती.
कॉइनगेको या कंपनीच्या आकडेवारीनुसार वर्ल्ड क्रिप्टो करन्सी मार्केटची एकूण उलाढाल 1 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा कमी आहे. आज बिटकॉइन 2% ने वधारला आणि तो 17230 डॉलर इतका झाला. मागील तीन तिमाहींमध्ये बिटकॉइनचा भाव सातत्याने घसरत आहे. बिटकॉइनने या 69000 डॉलरचा सार्वकालीन उच्चांकी स्तर गाठला होता. मागील 24 तासात बिटकॉइनचा भाव 17424 डॉलर इतका वधारला होता. मात्र ही तेजी फारकाळ टिकली नाही.
बिटकॉइनपाठोपाठ दुसरा लोकप्रिय क्रिप्टो कॉइन इथेरियमच्या किंमतीत देखील मोठी वाढ झाली आहे. आज इथेरियम 3% ने वाढला आणि त्याचा भाव 1281 डॉलर इतका झाला. डॉजकॉइनचा भाव 0.09 डॉलर असून शिबू कॉइन 0.000009 डॉलर आहे.
'कॉइनमार्केटकॅप'नुसार आज बीएनबी कॉइनचा भाव 290.88 डॉलर आहे. त्यात मागील 24 तासांत 2.26% वाढ झाली. यूएसडी कॉइनचा भाव 1.00 डॉलर आहे. एस्कआरपी कॉइनच्या किंमतीत आज घसरण झाली असून त्याचा भाव 0.39 डॉलर आहे. कार्डानोचा भाव 0.31 डॉलर आहे. लिटेकॉइनचा भाव 78.12 डॉलर असून सोलानाचा भाव 13.88 डॉलर आहे.