Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Crypto Price Today: बिटकॉईनसह इथेरियम व इतर टोकन्सच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या आजचा दर

Crypto Currency Rate Today

Crypto Price Today: क्रिप्टो बाजारात अनेकवेळी अनपेक्षित हालचाली घडत असतात. मंगळवारी 17 जानेवारी 2023 रोजी काही क्रिप्टोकरन्सी घसरल्या आहेत. बिटकॉईन (Bitcoin ) हे जगातील सर्वात मोठे आभासी चलन आहे. बिटकॉईनच्या किमतीत 0.2 टक्क्यांनी घसरण झाली आहे. तसेच इथेरियम (Ethereum) या चलनाच्या किमतीत 0.4 टक्के घट झाली.

क्रिप्टो बाजारात अनेकवेळी अनपेक्षित हालचाली घडत असतात. मंगळवारी 17 जानेवारी 2023 रोजी काही क्रिप्टोकरन्सी घसरल्या आहेत. बिटकॉईन (Bitcoin ) हे जगातील सर्वात मोठे आभासी चलन आहे. बिटकॉईनच्या किमतीत 0.2 टक्क्यांनी घसरण झाली आहे. तसेच इथेरियम (Ethereum) या चलनाच्या किमतीत 0.4 टक्के घट झाली आहे.

क्रिप्टो बाजारात लवकरच मोठी बूल रन बघायला मिळणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे. बिटकॉईन $21000 या किमतीवर स्थिर झाला आहे लवकरच बिटकॉईन $23000 ही अपेक्षित पातळी गाठेल अशी आशा विश्लेषकांनी  व्यक्त केली.

बिटकॉईनने 28 टक्के वाढीसह केली वर्षाची सुरुवात

बिटकॉईनने 2023 ( Bitcoin 2023) या वर्षाची सुरुवात 28 टक्के लक्षणीय वाढीसह केली. 2022 मध्ये काही गुंतवणूकदारांनी बिट कॉईन मध्ये झालेली घसरण पाहून आपल्या जवळील क्रिप्टो करन्सीची विक्री केली होती त्यांच्यासाठी ही वाढ आश्चर्यकारक ठरली आहे. अनेक जणांना असा विश्वास आहे की बिटकॉईनची सध्याची गती ही पुढे जाऊन चांगली बातमी देऊ शकते.

या कॉइन्सच्या किमतीत बघायला मिळाली घसरण

इथेरियम दुसरे सर्वात मोठे आभासी चलन आहे. इथेरियमचे मार्केट कॅप (Ethereum Market Cap) $190.3 अब्ज डॉलर इतके हे. गेल्या 24 तासात इथेरियमची किंमत 0.9 टक्के इतकी घसरली आहे. इथरच्या मूल्यात यावर्षी 31 टक्के इतकी वाढ झाली आहे. Dogecoin – मीमवर आधारित आभासी चलन Dogecoin मंगळवारी 4.3 टक्के घसरले.  Solana 1.5 टक्क्यांनी घसरून $23.2 डॉलर्सवर आला. Tether, Steller, XRP, Palkadot, Chainlink, Litecoin, Uniswap या क्रिप्टोकरन्सी मंगळवारी घासारतांना बघायला मिळाल्या आहेत.

डिसेंट्रलँड आणि सँडबॉक्स या कॉईन्सवर गुंतवणूकदारांची नजर

डिसेंट्रलँडचे मूल्य कालपासून 8 टक्क्यांनी वाढले आहे. सँडबॉक्सची किंमत 5.11 टक्क्यांनी वाढून या दोन कॉईन्समध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार होतांना दिसत आहे. फेसबुकने जाहीर केलेल्या मेटाशी (Facebook Meta) या कॉईन्सचा संबंध असणार आहे असे अनेक विश्लेषकांनी सांगित