क्रिप्टो करन्सीमध्ये आज 3 मार्च 2023 रोजी प्रचंड उलथापालथ झाली आहे. क्रिप्टो बँक सिल्व्हरगेटच्या शेअर्समधील पडझडीचे पडसाद वर्ल्ड क्रिप्टो मार्केटवर उमटले. आज बिटकॉइन, इथेरियमसह प्रमुख क्रिप्टो कॉइन्सच्या किंमतीत मोठी घसरण झाली.
क्रिप्टो एक्सचेंज कॉइनबेसवर आज गुंतवणूकदारांनी चौफेर विक्रीचा सपाटा लावला आहे. मात्र बायनान्स, बिटफिनेक्स, कुकॉइन, ओकेएक्स, क्राकेन या एक्सेंजेसवर मात्र फारसा परिणाम झालेला नाही. कॉइनबेसवर आज बिटकॉइनचा भाव इंट्राडेमध्ये 5% घसरला. तो 22020 डॉलरपर्यंत खाली आला. सध्या बिटकॉइनचा भाव 22356.52 डॉलर इतका आहे. ओपनमार्केट बिटकॉइन फ्युचर्सचा दर 8% ने कोसळला होता. या पडझडीनंतर बिटकॉइनची मार्केट कॅप 20 बिलियन डॉलरने कमी झाली असून ती 431.9 बिलियन डॉलर इतकी आहे.
इथेरियम या कॉइनच्या किंमतीत देखील 4.93% घसरण झाली आहे. इंट्राडेमध्ये इथेरियमने आज 1550 डॉलरची पातळी तोडली होती. मात्र त्यानंतर इथेरियम काही प्रमाणात सावरला. सध्या एका इथेरियमाचा भाव 1569.38 डॉलर इतका आहे. इथेरियमची मार्केट कॅप 191.9 ट्रिलियन डॉलर इतकी आहे.
कॉइनमार्केट कॅप या क्रिप्टो एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार आज क्रिप्टो मार्केटची एकूण उलाढाल 1.07 ट्रिलियन डॉलर इतकी आहे. आज तिथेर कॉइनचा भाव 1 डॉलर इतका आहे. बीएनबी कॉइनच्या किंमतीत आज 2.56% घसरण झाली. बीएनबी कॉइनचा भाव 291 डॉलर इतका आहे. यूएसडी कॉइनचा भाव 0.9999 डॉलरवर स्थिर आहे.
कार्डानो कॉइनच्या किंमतीत देखील आज 3.89% घसरण झाली. एका कार्डाने कॉइनचा भाव 0.3382 डॉलर इतका आहे. पॉलीगॉन या मेमे कॉइन्सचा भाव किंचित वधारला आहे. पॉलीगॉनचा भाव 1.18 डॉलर इतका आहे. डॉजकॉइनचा भाव 0.07589 डॉलर इतका आहे. त्यात 0.14% इतकी वाढ झाली. बायनान्स यूएसडी कॉइनचा भाव 1.00 डॉलर इतका आहे. सोलाना कॉइनचा भाव 21.16 डॉलर असून त्यात मागील 7 दिवसांत 10.67% घसरण झाली आहे.
पोलकाडॉटचा भाव 0.20% कमी झाला असून तो 6.05 डॉलर इतका आहे. लिटेकॉइनचा भाव 89 डॉलरवर आहे. शिबू इनू कॉइनच्या किंमतीत मागील 24 तासांत 5% घसरण झाली आहे. सध्या एका शिबू इनू कॉइनचा भाव 0.00001138 कॉइन इतका आहे. अलव्हांचे कॉइनचा भाव 16.46 डॉलर इतका आहे. डाई कॉइनचा भाव 0.99 डॉलर इतका आहे.