मागील आठवड्यात क्रिप्टो चलन बाजारात प्रचंड घसरण झाली होती. या पडझडीतून क्रिप्टो करन्सी सावरले आहेत. आज सोमवारी 19 डिसेंबर 2022 रोजी बिटकॉइन, इथेरियम, बीएनबी, एक्सआरपी या क्रिप्टो करन्सीच्या किंमतीत वाढ झाली आहे. क्रिप्टो मार्केटची एकूण उलाढाल आज 0.60% ने वाढली आहे. आज 812.94 बिलियन डॉलर्स इतके व्यवहार झाले. मागील 24 तासांत हे प्रमाण 5.64% होते. क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढल्याचे दिसून आले.
कॉइनमार्केटकॅपनुसार आज बिटकॉइनचा भाव 16750.41 डॉलर इतका आहे. त्यात 0.10% वाढ झाली आहे. मात्र मागील 7 दिवसांत 0.08% इतकी वाढ झाली. बिटकॉइनची मार्केटकॅप 322253563269 डॉलर इतकी आहे. भारतीय चलनात बिटकॉइनचा भाव 14.60 लाख रुपये इतका आहे.
इथेरियमचा भाव 1184.57 डॉलर असून त्यात 0.13% वाढ झाली आहे. तिथेरचा भाव 1.00 डॉलरवर कायम आहे. यूएसडी कॉइनचा भाव 0.9999 डॉलर इतका असून बीएनबी कॉइनचा भाव 247.80 डॉलर इतका आहे. बीएनबी कॉइनच्या किंमतीत 0.38% वाढ झाली आहे.
एक्सआरपी कॉइनचा भाव 0.34 डॉलर इतका आहे. त्यात मात्र 2.57% घसरण झाली आहे. डॉजकॉइनचा भाव 0.077 डॉलर असून त्यात 1.21% घसरण झाली. कार्डानोचा भाव 0.26 डॉलर आहे. पोलिगॉनचा भाव 0.79 डॉलर असून पोलकाडोटचा भाव 4.62 डॉलर आहे. आज शिबू इनू कॉइनच्या किंमतीत 1.52% वाढ झाली. तो 0.0000086 डॉलरवर आहे. लिटेकॉइनचा भाव 63.58 डॉलर असून त्यात 0.61% घसरण झाली आहे.
फेडरल रिझर्व्हने गुरुवारी व्याजदरात 0.50% वाढ केली होती.अमेरिकेतील वाढती महागाई पाहता नजीकच्या काळात आणखी व्याजदरात वाढ करण्याचे संकेत बँकेने दिले होते.फेडरलने अति जोखमेच्या मालमत्तांबाबत क्रिप्टोबाबत प्रश्न उपस्थित केला होता.त्यामुळे क्रिप्टो मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली होती. बिटकॉइनचा भाव 16500 डॉलरखाली घसरला होता.