फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्याचे पडसाद सलग दुसऱ्या दिवशी क्रिप्टो करन्सी मार्केटवर उमटले. आज शुक्रवारी 16 डिसेंबर 2022 रोजी बिटकॉइनसह प्रमुख क्रिप्टो कॉइनच्या किंमतीत घसरण झाली. मागील 24 तासांत ग्लोबल क्रिप्टो मार्केटची उलाढाल 850 बिलियन डॉलर खाली आली आहे. तर दैनंदिन उलाढाल 27% ने कमी झाली असून हा आकडा 33.8 बिलियन डॉलर इतका खाली आला.
फेडरल रिझर्व्हने गुरुवारी व्याजदरात 0.50% वाढ केली होती. अमेरिकेतील वाढती महागाई पाहता नजीकच्या काळात आणखी व्याजदरात वाढ करण्याचे संकेत बँकेने दिले होते. फेडरलने अति जोखमेच्या मालमत्तांबाबत देखील रिएलिटी चेक करण्याचे संकेत दिले आहेत. महागाई वाढण्यास डिटीजल टोकन्स अप्रत्यक्षपणे कारणीभूत ठरत असल्याचे बँकेने म्हटले होते. त्यामुळे क्रिप्टो मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली.
आज बिटकॉइन (Bitcoin), इथेरियम (Ethereum), तिथेर (Tether), यूएसडी कॉइन (USD Coin), बीएनबी (BNB), एक्सआरपी (XRP), बायनान्स यूएसडी अशा प्रमुख चलनांच्या किंमतीत घसरण झाली. मागील 24 तासांत बिटकॉइनचा भाव 3.29% ने घसरला आहे. सध्या एका बि़टकॉइनचा भाव 17082.30 डॉलर इतका आहे. बिटकॉइननंतर जगभरात दुसरा लोकप्रिय कॉइन असलेल्या इथेरियमला देखील आज विक्रीचा फटका बसला. आज इथेरियमच्या किंमतीत 5.32% घसरण झाली आहे. सध्या इथेरियमचा भाव 1214.67 डॉलर इतका आहे.
तिथेरचा भाव 1 डॉलर इतका असून यूएसडी कॉइनचा भाव 0.999 डॉलर इतका आङे. बीएनबी कॉइनचा भाव 253.84 डॉलर इतका असून मागील 24 तासांत त्यात 4.29% घसरण झाली. एक्सआरपी कॉइनच्या किंमतीत 4.26% घसरण झाली असून त्याचा भाव 0.36 डॉलर आहे.
बायनान्स यूएसडी कॉइनचा भाव 0.99 डॉलर असून डॉजकॉइनचा भाव 0.08 डॉलर आहे. डॉजकॉइनचा भाव 6% इतकी घसरण झाली. कार्डानोचा भाव 0.28 डॉलर असून पॉलिगोनचा भाव 0.84 डॉलर आहे. पोलकाडॉटचा भाव 5.09 डॉलर असून सोलाना कॉइनचा दर 13.46 डॉलर आहे. सोलानाच्या किंमतीत आज 4.42% घसरण झाली. शिबू इनूचा भाव 0.0000085 डॉलर असून लिटेकॉइनचा भाव (Litecoin) 69.49 डॉलर इतका आहे.